ETV Bharat / city

IT Raid Bajrang Kharmate : बजरंग खरमाटेंच्या घरी आयटीचे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच - बजरंग खरमाटे मराठी बातमी

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली ( IT Raid Bajrang Kharmate ) होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरुच आहे.

Bajrang Kharmate
Bajrang Kharmate
author img

By

Published : Mar 9, 2022, 1:15 PM IST

पुणे - मुंबईसह पुण्यात आयकर विभागाची कालपासून छापेमारी सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे पदाधिकारी, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल तसेच सदानंद कदम यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु ( IT Raid Bajrang Kharmate ) आहे.

पुण्यातील औंध भागातील बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल ( मंगळवार ) सकाळपासून तळ ठोकला आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती बजरंग खरमाटे यांच्या नावावर असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी खरमाटेंच्या भुगावमधील फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आलेला. आता पुन्हा आयकर विभागाने खरमाटे यांच्या औंध येथील घरी छापा टाकला आहे.

काय आहेत आरोप?

बजरंग खरमाटे हे पूर्वी नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उपपरिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात कार्यरत आहेत. तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या जवळचे ते मानले जातात. मंत्री अनिल परब आणि अधिकारी बजरंग खरमाटे यांनी एकत्रित मिळून कोट्यवधीचा घोटाळा केला. नंतर ते पैसे आपापसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

हेही वाचा - Satej Patil On Fadnavis Allegation : फडणवीसांनी दिलेल्या पुराव्यांची सत्यता पडताळली जाईल - गृहराज्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.