पुणे - हिंदू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा आज वाढदिवस आहे. ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा अनेक गायक तसेच कलाकारांना सहवास लाभला आहे. त्यातीलच पुण्यातील दरबार बँडचे गायक इक्बाल दरबार यांना देखील मोहम्मद रफी यांचा सहवास लाभला होता. आज इक्बाल दरबार ( Iqbal Darbar on Mohammed Rafi B’day ) यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी संवाद साधला.
शेषराव वानखडे हे जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांनी एक योजना सुरू केली होती स्मॉल सेव्हिंग. या योजनेच्या माध्यमातून 5 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला मोहम्मद रफी देखील होते. सुरवातीला 4 ही कार्यक्रमामध्ये मोहम्मद रफी हे त्यांचं गायन करून निघून जात होते. पण शेवटच्या कार्यक्रमात त्यांचं गायन झाल्यानंतर देखील ते शेवटपर्यंत थांबले होते. त्यादिवशी जेव्हा शेवटी माझ्या गाण्याची वेळ आली, तेव्हा मी स्टेजसमोरच रफी साहेब यांना पाहिल्यावर माझ्या जीवात जीव नव्हता .ज्याला गुरू मानतो त्यांच्याच समोर जर त्यांचीच गाणी गायचं, म्हणजे खूप टेन्शन होत. पण मनाला धीर दिला आणि मी त्यांच्याच समोर त्यांचं गाणे 'मेरे मितवा आजा तुजको पुकारू' हे गीत गायल. त्यांनी समोर बसून हात वर करून मला दादा दिली. त्यांनी दिलेली ही दाद आजही अविस्मरणीय आहे, असं यावेळी दरबार म्हणाले.
आत्ता पर्यंत 13 लोकांना देण्यात आला आहे पुरस्कार -
मी माझ्या दरबार बॅंडच्या नावाने मोहम्मद रफी फाउंडेशन सुरू केलं आणि 1999 पासून या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गोर गरिबांना मदत केली आहे. त्यानंतर याच फाउंडेशनच्यावतीने मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार ( Mohammed Rafi Lifetime Achievement Award ) सुरू करण्यात आला असून आत्तापर्यंत 13 लोकांना पुरस्कार देण्यात आलं आहे, असं देखील दरबार यांनी सांगितले.
हेही वाचा - Mohammed Rafi B’day Special : दिवाना हुआ बादल...रफींच्या वाढदिवसानिमित्त ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ताज..