ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवडमधील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोविड-१९ लसीकरण केंद्र - पुणे कोरोना लसीकरण

पिंपरी-चिंचवडमधील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोविड-१९ लसीकरण केंद्र उभे करण्यात आले आहे. हे कोविड सेंटर २८ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Apr 27, 2021, 8:52 PM IST

पुणे - पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या सहकार्याने शहरातील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोविड-१९ लसीकरण केंद्र रोटरी क्लब सभागृह संभाजीनगर चिंचवड येथे बुधवार २८ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्ष नेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

दिव्यांग व्यक्तींनी लस घ्यावी यासाठी लसीकरण केंद्र -

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोविड-१९ लसीकरण केंद्र शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून स्वतंत्रपणे लसीकरण केंद्र रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात येत आहे. असा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात एकूण २१४५ दिव्यांग ४५ वर्षावरील असून ते लसीकरणासाठी पात्र आहेत. नागरवस्ती विेभागाकडील दिव्यांग कक्ष विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष मेहूल परमार यांचे समवेत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे..

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची सुविधा -

सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे. लसीकरण केंद्रावर आकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक कार्यरत असणार आहे. कोविड लसीकरण हे सुरक्षित आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.