पुणे - गुरूपौर्णिमा ( Guru Purnima ) कधी साजरी केली जाते, तिथीनुसार आषाढ महिन्यातील ( Ashadh month ) शुद्ध पौर्णिमेला ( Purnima ) ‘गुरूपौर्णिमा’ साजरी केली जात असते. या वर्षी ‘13 जुलै’ आज गुरूपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
गुरूपौर्णिमा म्हणजे काय - 'गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत ( Indian culture ) गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजन करत असतात. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जात असते.
व्यास पौर्णिमा ही म्हणतात - गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला आहे. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहार शास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते.
गुरूपूजन - गुरूपौर्णिमेला ‘गुरूपूजन’ करण्याची पद्धत आहे. गुरूपूजन म्हणजे गुरूंची पाद्यपुजा करणे.
गुरू- शिष्य परंपरा - भारतात प्राचीन काळापासून गुरू- शिष्य परंपरा आहे. कृष्ण- अर्जुन, अर्जून- द्रोणाचार्य, एकलव्य- द्रोणाचार्य, चाणक्य- चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात. भारतात पूराण काळापासून गुरू- शिष्य परंपरा आहे.
पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असत - अगोदर काळात शिष्य स्वतः चे घर सोडून गुरूगृही राहत असत. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असत. ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असत. आता मात्र, गुरूकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र, गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे.
गुरूपूजनाचा खरा अर्थ - आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं, गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झाले. यासाठी सतत गुरू बद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरं गुरूपूजन, अशा प्रकारच्या गुरूपूजनातून गुरूला खरी गुरूदक्षिणा मिळत असते.