पुणे - मागील दोन दिवसांपासून राज्यासह पुण्याच्या तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दुपारच्या सुमारास तर पुण्यातील तापमान ४० अंशापर्यंत गेलेलं पाहायला मिळत ( Heat Wave In Maharashtra ) आहे. त्यातच पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.
काय आहे वाढत्या उष्णतेच कारण
सूर्य पूर्णपणे विषुववृत्तीय भागात आहे. त्यामुळे सूर्याची थेट किरणे आपल्यावर पडत आहे. त्याचे पिकांना आणि आरोग्याला नुकसान होणार आहे. म्हणून नागरिकांनी 15 एप्रिल पर्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ञांनी केलं आहे.
विदर्भात तापमान उच्चांक गाठणार
विदर्भातील तापमानात वाढ होणार आहे. तसेच, पुण्यात देखील तापमान 42 अंशावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ञांकडून केले जात आहे.
हेही वाचा - एमआयएमचा प्रस्ताव सध्या तरी काँग्रेसला मिळाला नाही, प्रस्ताव आल्यावर विचार करू - नाना पटोले