ETV Bharat / city

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु - गृहमंत्री - पुणे दिलीप वळसे पाटील

सहकारी संस्थांनी आजपर्यंत उत्तम काम करत गरजेनुसार नागरिकांना मदत केलेली आहे. सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून आवश्यक तेथे सहकार कायद्यात, शासन निर्णयात अनुकूल बदल करण्यासाठी प्रयत्न करू, असेही गृहमंत्री म्हणाले.

पाटील
पाटील
author img

By

Published : Nov 22, 2021, 5:05 AM IST

पुणे - सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी केले आहे. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिषदे प्रसंगी ते बोलत होते.

'सहकार कायद्यात, शासन निर्णयात अनुकूल बदल करण्यासाठी प्रयत्न करू'

वळसे-पाटील म्हणाले, सहकारी पतसंस्था या सर्वसामान्य नागरिकांच्या संस्था असून नागरिकांच्या गरजा भागविण्याचे काम करतात. सहकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. सहकारी संस्थांनी आजपर्यंत उत्तम काम करत गरजेनुसार नागरिकांना मदत केलेली आहे. सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून आवश्यक तेथे सहकार कायद्यात, शासन निर्णयात अनुकूल बदल करण्यासाठी प्रयत्न करू, असेही गृहमंत्री म्हणाले.

हेही वाचा - कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळ बुधवारी मंजूरी देण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.