पुणे - पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. या सांस्कृतिक राजधानीमध्ये तुळशीबाग ( Tulshibagh Pune ) हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील रामाचे मंदिर व परिसर आजही अनेकांना आकर्षित करतो. हे मंदिर पेशवेकालीन ( Peshwekalin Ram Temple Pune )असून नारोजी आप्पाजी तुळशीबागवाले यांनी हे मंदिर बांधले आहे. नारोजी आप्पाजी हे पेशवाईतील प्रसिद्ध कर्तबगार व्यक्तिमत्त्व होते. नारोजींचे जवळचे गोविंदराव खासगीवाले यांची ही जागा होती. ती नारोजी आप्पायांनी विकत घेतली आणि तिथे हे राम मंदिर बांधले. पेशव्यांच्या दरबारी जमा खर्च महसूल या विषयांमध्ये नारोजीनी मोठे काम केले होते.
मंदिराची पायाभरणी : १७५० बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी नारोजी आप्पा यांना पुणे प्रांतात सरसुभेदार केले होते. १७६१ मध्ये नारोजी आप्पा यांनी राम मंदिराची स्थापना केली. पानिपतच्या युद्धानंतर लगेचच नारोजी आप्पा यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात राम मंदिराची पायाभरणी केली. दोन वर्षांनी म्हणजे १७६५ च्या नोव्हेंबरमध्ये राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी घडविल्या त्याबद्दल त्यांना 372 रुपये देण्यात आले होते.
मंदिराचे वैशिष्ट्य : राम मंदिर पूर्ण होण्यास बराच कालावधी लागला. त्यावेळेस या राम मंदिर मिळण्यास १३,६६६७ रुपये एवढा खर्च आला. खर्ड्याच्या लढाईत केलेल्या नवसा नुसार सवाई माधवराव पेशवे यांनी उत्तरेकडे दरवाजावर नगारखाना आणि चौघडा देखील सुरू केला. तुळशीबाग मंदिर एकूण एक एकर आवरत आहे. उत्तर दक्षिण पश्चिम अशा तीन दिशांनी या मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या मंदिराच्या शिखरावरील कळस चार फुटाचा आहे. असे शिखर पुन्हा दुसरे कुठेही नाही. या मंदिराचा सभामंडप वीस फूट उंचीचा असून त्यात तीन दालने आहेत. मंडपाचे छत लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. मुख्य मंदिराभोवती गणपती, दत्त, विठ्ठल रुक्मिणी, महादेव, मारुती व शेषशायी ही मंदिरे आहेत. या मंदिरातील मुख्य उत्सव म्हणजे रामनवमीचा उत्सव आजही प्रसिद्ध आहे. पेशवेकाळात अनेक मंदिरे उभारली गेली परंतु तुळशीबाग राम मंदिर आजही जुन्या सुरुवात भव्यता टिकून आहे.
हेही वाचा - Remembrance of Jai Shri Rama : पावणेदोन कोटी वेळा लिहून केले 'श्रीरामा'चे नामस्मरण