ETV Bharat / city

Cyber Crime Pune : उच्चशिक्षित तरुणीला लाखोंचा गंडा ; सायबर गुन्हेगारांकडून उच्चशिक्षित लोकं टार्गेट

पुण्यात एका तरुणीला सायबर गुन्हेगाराकडून तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा घातला (young girl cheated by cyber criminals) आहे. यावरून नागपूरच्या 23 वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, असून त्यानुसार डायना स्पेन्सर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला (Cyber Crime Pune) आहे.

Cyber Crime Pune
पुण्यात सायबर गुन्हेगारी
author img

By

Published : Oct 7, 2022, 1:16 PM IST

पुणे : पुण्यात एका तरुणीला सायबर गुन्हेगाराकडून तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा घातला (young girl cheated by cyber criminals) आहे. यावरून नागपूरच्या 23 वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, असून त्यानुसार डायना स्पेन्सर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला (Cyber Crime Pune) आहे.

नक्की काय घडले - फिर्यादी या दादर नगर हवेली येथे नोकरीला असून त्या पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अ‍ॅमेझॉनची एक लिंक आली. त्यामध्ये ई कॉमर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करा व पैसे कमवा असे लिहिले होते. तेव्हा त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका मोबाईलवरुन मेसेज आला व त्यांना सर्व रजिस्ट्रेशन प्रक्रिया समजून सांगितली. त्यामध्ये लॉग इन करुन तुम्ही जर रिचार्ज केले, तर तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा केले जाईल, असा मेसेज केला. एक पेज ओपन झाले. त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती भरुन त्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन केले.

विश्वास संपादन करून फसवणूक - जसे त्यांनी लॉग इन केले, त्यांच्यासमोर एक अ‍ॅमेझॉनचे पेज ओपन झाले. त्यामध्ये त्यांना सुरुवातीला रिचार्ज करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला त्या पेजवरुन २०० रुपये रिचार्ज केले. त्यानंतर त्यांच्या खात्यात लगेच ४०० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. म्हणून त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी एक टास्क (cyber criminals target high educated people) दिला. त्यामध्ये त्यांना आणखी रिचार्ज करायला सांगितले. तेव्हा त्यांनी पुन्हा ५०० रुपयांचे रिचार्ज केले. त्यानंतर त्यांच्या खात्यात ९६० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. अशा प्रकारे त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्यांना पुन्हा १ हजार रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. त्यांनी रिचार्ज केल्यानंतर तेव्हा त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

पोलिसांत धाव घेत तक्रार - त्यानंतर फिर्यादी यांनी विचारणा केल्यावर त्यांना तुम्हाला टॉपअप मारल्यानंतर तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा करणार म्हणून त्यांनी पुन्हा १ हजार रुपयांचे टॉपअप मारले. तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यांना वारंवार रिचार्ज करायला सांगितले. त्याप्रमाणे त्या रिचार्ज करीत गेल्या. प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून त्यांना पुन्हा रिचार्ज करण्यासाठी सांगत होते. काहीही न करता पैसे मिळणार असे वाटल्याने फिर्यादी त्यांना भुलल्या व रिचार्ज करीत गेल्या. अशा प्रकारे त्यांनी तब्बल १ लाख १३ हजार १३७ रुपयांचे रिचार्ज दुपारी २ ते साडेपाच वाजेच्या दरम्यान मारले. तेव्हा त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली (cyber criminals) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.