पुणे - राज्यात पुढील 48 तासांत म्हणजेच 27 आणि 28 सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. एका दिवसात 20.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस तसेच मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोकण, गोवा, पालघर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी 28 तारखेला अतिवृष्टी इशाराही हवामान विभागाने वर्तवला आहे.
'या' जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्रातील धुळे व जळगाव आणि नाशिक येथे 28 तारखेला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे आणि अहमदनगरमध्ये 27 आणि 28 ला मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक आणि धुळेमध्ये 29 तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात 28 आणि 29 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये आज (सोमवारी) अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभाने सांगितले आहे. तर तिकडे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगलीत 27 आणि 28 तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि परिसरात येणाऱ्या काही दिवसांत ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी मध्यम तर पुणे शहराच्या आजूबाजूच्या घाट परिसरात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा -एनडीएमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे लष्कर न्यायालयाचे आदेश
हेही वाचा - World Tourism Day : पर्यटनाची राजधानी असलेले औरंगाबाद सोयी-सुविधांपासून वंचित