ETV Bharat / city

Heavy Rain : पुण्यात रात्री ९ नंतर पावसाचा धुमाकूळ , पावसाचे 'इतके' राहिले प्रमाण - मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ

परतीच्या पावसाला सुरवात झाल्यापासून पुणेसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस ( Heavy rain in pune ) पडताना पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी तर काही ठिकाणी घरात पाणी गेल्याने रात्रभर नागरिकांना उभे राहावे लागले आहे. ( 104 millimeters of rain was recorded )

Heavy Rain
शहरात रात्रभर मुसळधार पाऊस
author img

By

Published : Oct 18, 2022, 9:48 AM IST

Updated : Oct 18, 2022, 11:33 AM IST

पुणे : परतीच्या पावसाला सुरवात झाल्यापासून पुणेसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस ( Heavy rain in pune ) पडताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरोरोज पुणे शहरात पाऊस होत असून दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रीच्या वेळेस पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत.

सोमवारी रात्री ९ नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या संततधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अवघ्या १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली ( 104 millimeters of rain was recorded ) आहे.

शहरात रात्रभर मुसळधार पाऊस

हायवेवरील वाहतुकीवरही परिणाम : पहाटे पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी शहरातील अनेक भागात पाणी साचलं होत. रात्रभर सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांची झोपही उडवली. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होत. तर या पावसामुळे हायवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरासह पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं होतं. पुण्यातील पावसाचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसला देखील बसला. त्यामुळे प्रवाशांना फलाटावरचं उभे राहण्याची वेळ आली होती. तिकीट काउंटरच्या ठिकाणीदेखील गुडघाभर पाणी साचलं होते. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी तर काही ठिकाणी घरात पाणी गेल्याने रात्रभर नागरिकांना उभे राहावे लागले आहे.

नागरिकांनी खबरदारी बाळगावी : पुढील दोन दिवस दिवसभर आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी त्याच बरोबर पावसाचा अंदाज घेऊन दिवसभराच्या कार्यक्रमांची आखणी करावी असं आवाहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Last Updated : Oct 18, 2022, 11:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.