पुणे - गेल्या आठवड्याभरापासून पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने आज सकाळपासून शहर तसेच धरण परिसरात जोर धरला ( Heavy Rain In Khadakwasla Dam Area ) . खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीत 5 हजार992 क्यूसेकने विसर्ग सुरू ( Water Discharge from Khadakwasla dam ) करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासलामध्ये 100 टक्के पाणीसाठा - राज्यभर गेल्या आठवड्यापासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून पुणे शहर तसेच जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहराच्या आजुबाजूला चार महत्वाची धरणे आहेत. त्यात खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांचा समावेश आहे. पानशेत 35.82 टक्के पाणीसाठा, वसरगाव 33.58, टेमधर 21.88 आणि खड़कवासला 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीच्या ( Mutha river ) पात्रात विसर्ग केला जात आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे आजुबाजूच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा ( administration alert villagers ) देण्यात आला आहे. आजुबाजूच्या गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसामुळे अनेकांचे नुकसान होते. त्यामुळे काळजी घेण्याचे आणि स्वत:चा बचाव करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.
पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला - धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी असल्याने पुण्यात पाणीकपात करण्यात आली होती. त्यामुळे अनेक परिसरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार होते. महापालिकेने आषाढी एकादशी आणि ईदच्या निमित्ताने पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर - नाशिकमध्ये गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला ( Nashik Godavari River Flood ) आहे. आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरी नाशिकच्या गंगापूर धरणातून ( Gangapur Dam Nashik ) 10 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोदा पात्रातील लहान, मोठे मंदिर पाण्याखाली गेली आहेत. तसेच दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. नाशिकमध्ये रेड अलर्टमुळे सर्वच शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना घेऊन गोदावरी नदीकाठी पूर बघण्यासाठी गर्दी करत आहेत. नाशिकच्या मध्यवर्ती असलेल्या व्हिक्टोरिया पुलावर नागरिकांची सेल्फी काढण्यासाठी गर्दी होत आहे. अशात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या भागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कृपया करून नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असा आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आला.
पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याच्या वाटेवर - कोल्हापूरात पावसाचा जोर वाढला ( Heavy rains in Kolhapur ) असून पंचगंगा नदी ( Flood of Panchganga river ) कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी तात्काळ स्थलांतरणासाठी (ready for evacuation) तयार राहावे असे निर्देश कोल्हापूचे जिल्ह्याधिकारी राहूल रेखवार ( Collector Rahul Rekhawar ) यांनी दिले आहेत. गावकऱ्यांनी आवश्यक साहित्य सोबत घेण्याच्या सुचना देखील केली आहे. सध्या पाणीपातळी पंचगंगा नदीची ( Panchganga river Flood ) पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे.
हेही वाचा - Mukhtar Abbas Naqvi: लोकसंख्येचा स्फोट हा कोणत्याही धर्माची नसून ती देशाची समस्या आहे -नकवी