पिंपरी-चिंचवड - मराठी ही समृद्धी भाषा (Marathi Elite Language ) आहे. तिला अभिजात म्हणा की पारिजात म्हणा. मी एव्हढंच सांगेन, मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करा, असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जाबाबत टिप्पणी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind ) यांना पत्र पाठवत मोहीम सुरू केली आहे. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मात्र थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. ते म्हणाले, मराठी ही भाषा सर्वश्रेष्ठ आहे. तिला अभिजात म्हणा पारिजात म्हणा त्याचा काही फरक पडत नाही. तिचा वापर करावा हेच मी सांगत असल्याचे मत व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर राज्यपाल कोशारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेची अप्रत्यक्ष बेदखल केल्याचं स्पष्ट होते.