ETV Bharat / city

गुडविन ज्वेलर्सचे मालक अक्काराकरन बंधुना अटक - Pune District Latest News

गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक अक्काराकरन बंधूंना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुनीलकुमार मोहनन अक्काराकरन आणि सुधीरकुमार अक्काराकरन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुडविन ज्वेलर्सचे मालक अक्काराकरन बंधुना अटक

author img

By

Published : Mar 23, 2021, 10:00 PM IST

पुणे - गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक अक्काराकरन बंधूंना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुनीलकुमार मोहनन अक्काराकरन आणि सुधीरकुमार अक्काराकरन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीतून पुणे पोलिसांनी त्यांना पुण्यातील गुन्ह्यात वर्ग करत अटक केली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 सह इतर कलमाखाली गुन्हा दाखल आहे. याबाबत आशा गायकवाड (वय 45) यांनी तक्रार दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण सप्टेंबर 2019 मधील आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी सुनीलकुमार हा गुडविल कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर सुधीरकुमार हा डायरेक्टर आहे. गुंतवणूक केल्यास चांगाला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांना त्यांच्या ज्वेलर्समधील स्कीम आणि भिशीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले होते. परंतु गुंतवणूकदारांना त्यांनी कुठलाही परतावा दिला नाही. यातील फिर्यादी आशा गायकवाड यांनीही तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान पुणे पोलिसात याप्रकरणी तक्रार आल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास दिला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. हा फसवणुकीचा आकडा तीन कोटीपर्यंत गेला होता. दरम्यान त्यानंतर गुडविन विरोधात इतरही काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दोघेही बंधू मागील काही दिवसांपासून ठाणे पोलिसांच्या कोठडीत होते. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांना पुण्यातील गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - 'अपनेही जाल में फ---स', राष्ट्रवादीचा फडणवीसांवर निशाणा

हेही वाचा - शरद पवारांची प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा; रवीशंकर प्रसाद यांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.