पुणे - कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचं वातावरण आहे. कोरोनावर आधीच अस्तित्वात असलेली प्रतिबंधक लस नवीन व्हेरिएंटवर काम करेल का किंवा यासाठी नवीन लस बनवण्याची गरज आहे का, यावर चर्चा होत आहे. तर काही कंपन्यांनी लस बनवायला देखील सुरुवात केली आहे. अशातच पुण्यातील हिंजवडी येथील जिनोव्हा बायोफार्मासीयूटीकल्स कंपनीद्वारे ओमायक्रॉन व्हायरस विरोधातील लसीच्या 2 चाचण्या (anti Omicron vaccine by Genova Biopharmaceuticals Company) पूर्ण झाल्या असून लवकरच याला मान्यता देखील मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा -Post Covid Parosmia : पोस्ट कोविडने दुर्गंंधीत केले आयुष्य; तरुण 9 महिन्यापासून खातोय वरणभात
आपल्या जोखमीवर लसीच उत्पादन सुरू -
पुणे फर्मने अलीकडेच डेल्टा प्रकारावर विकसित केलेल्या त्यांच्या दोन डोस एमआरएनए लसीच्या 3 हजार पेक्षा जास्त विषयांचा फेज 2 चाचणी डेटा सादर केला आहे. फेज 3 चाचण्या पूर्ण करण्याच्या जवळ आहे. या कंपनीने आपल्या जोखमीवर हे लसीच उत्पादन सुरू केले आहे आणि याला मंजुरी मिळाल्यावर ती पुरेशा प्रमाणात उत्पादित करू शकणार असल्याचे देखील सांगितले जातं आहे. त्याचबरोबर लवकरच या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिनोव्हा 5 ते 17 वर्षे वयोगटातील बालरोग लसीवर देखील प्रगती करत आहे -
आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच देशाच्या कोविड लसीकरणासाठी एमआरएन प्लॅटफॉमचा वापर करून सुरक्षित आणि प्रभावी लस हा एक महत्त्वाचा पर्याय असू शकतो, असे सांगितले जात आहे. एमक्योर फार्मास्युटिकल्सची उपकंपनी जिनोव्हा 5 ते 17 वर्षे वयोगटातील बालरोग लसीवर देखील प्रगती करत आहे आणि त्यांनी चाचण्या घेण्यासाठी निर्धारित प्रोटोकॉल सादर केला आहे. एमआरएनए लस तंत्रज्ञान कृत्रिम स्वरूपाचे आहे आणि लस विकासाच्या वेळेची गती कमी करण्याची क्षमता आहे, असं देखील सांगितले जात आहे.