पुणे - कोरोनामुळे दुबईत अडकून पडलेल्या नागरिकांना 'मिशन वंदे भारत' अंतर्गत भारतात घेऊन परतत असताना एअर इंडियाच्या विमानाला केरळच्या कोझिकोड विमानतळावर अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विमानाचे मुख्य पायलट दिपक साठे यांचाही समावेश आहे. माजी एअर मार्शल भूषण गोखले आणि दीपक साठे हे हवाई दलात एकत्र होते. त्यांना श्रद्धांजली वाहताना भूषण गोखले म्हणाले, 'या दुर्घटनेत एअर इंडियाने उमदा ऑफिसर गमावला'.
हेही वाचा - केरळ विमान दुर्घटना : क्रॅश लँडिंगपूर्वी वैमानिकाकडून दोनदा लँडिंग अपयशी
'टेस्ट पायलट खूप कमी असतात, त्यापैकी एक होते कॅप्टन दीपक साठे. टेस्ट पायलटमध्ये ते निष्णात होते. फायटर विमानाचे पायलट असले, तरी ते ट्रान्सपोर्ट विमानेही चालवायचे. जगवॉर विमाने चालवणामध्ये ते निष्णात होते. या दुर्घटनेत चांगला आणि उमदा ऑफिसर आपण गमावला. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
हेही वाचा - केरळ विमान दुर्घटनेवर क्रिकेटपटूंनी दिल्या प्रतिक्रिया...वाचा ट्विट