ETV Bharat / city

कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही, मात्र स्पष्टता येण्याची गरज - आयएमए - corona virus news

अमरावती, बुलढाणा या भागात सापडत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा ब्राझील, ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिकेतून आलेला नवा स्ट्रेन आहे की काय? अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, यात काहीही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सरकारने अधिकृत पत्रक जारी करत स्पष्ट केले आहे.

अविनाश भोंडवे
अविनाश भोंडवे
author img

By

Published : Feb 20, 2021, 1:40 PM IST

पुणे - राज्यात सध्या अमरावती, बुलढाणा या विदर्भातील काही भागांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत असून रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, बुलढाणा या भागात सापडत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा ब्राझील ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिकेतून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे की काय? अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, यात काहीही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सरकारने अधिकृत पत्रक जारी करत स्पष्ट केले आहे. सरकारने अधिकृत माहिती जाहीर करण्यामागील कारणे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी संगितले आहेत.

अविनाश भोंडवे

पुण्यातील ससून रुग्णालयात अमरावती, बुलढाणा तसेच सातारा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. या नमुन्यांच्या तपासणीत कोरोना विषाणूचे म्युटेशन होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, हे म्युटेशन परदेशातून आलेल्या कोरोना विषाणू संदर्भातील नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकारने अधिकृत माहिती जाहीर करण्यामागील कारणे काय?

नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने वाढत्या रुग्णांबाबत माहिती प्रसिद्ध केली. सरकारने माहिती जाहीर करण्यामागील कारणे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितली आहेत. ते म्हणाले की, राज्य सरकारने परदेशातून आलेल्या नागरिकांची योग्य प्रकारे तपासणी करण्याच्या दृष्टीने कदाचित हे जाहीर केले असावे. तसेच सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे जे लसीकरण सुरू आहे या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे. काही डॉक्टरांच्या मते, सध्या कोरोनाचा जो विषाणू सापडत आहेत त्यात म्युटेशन होत असल्याने लसीचा त्यावर काही परिणाम होणार नाही अशा प्रकारची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली होती. ही शंका दूर करण्यासाठी सरकारने अधिकृत माहिती जारी केली असावी, असे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.