पुणे - राज्य सरकारच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या प्रमुख पाच आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. या आरोपीसह पोलीस उपायुक्त आणि 11 पोलीस अधिकारीदेखील कोरोनाबाधित झाले आहेत.
मुख्य आरोपी कोरोना पॉझिटिव्ह
आरोग्य भरतीच्या पेपरफुटी, त्यानंतर म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी तुकाराम सुपे, शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना कोरोनाची लागण झाली आहे. यांच्यासोबत सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के आणि 11 अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सर्वांना सौम्य लक्षण असल्याचं सांगितलं जातं आहे. पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंत 35 आरोपींना अटक करण्यात आली असून हे सर्व आरोपी हे विविध पेपरफुटी प्रकरणात सामील आहेत. पुणे पोलिसांकडून या पेपरफुटी प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.