पुणे - बुधवारी सायंकाळी सहा वाजता संगमवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ असणाऱ्या पुलावरून एका 30 वर्षीय महिलेने पाण्यात उडी मारली. त्या महिलेस वाचविण्यात अग्निशमन दलाचे जवान व जीवरक्षकांना यश आले आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी असा प्रकार घडला आहे.
महिलेने पुलावरुन उडी मारताच पुलाजवळ असणारे अग्निशमन दलाचे जवान चंद्रकांत सोनावळे आणि जीवरक्षक जगन तिकोणे, बापू तिकोणे, चेकन परदेशी व काळुराम टेमगिरे यांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी लगेचच बोट पाण्यात नेत त्या बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. बुडणाऱ्या महिलेला पाण्याबाहेर काढल्यानंतर महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले. महिलेचे नातेवाईक लगेचच घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा - पोहण्याची पैज पडली महागात; पुण्याच्या भिडे पुलावरून उडी मारलेला तरूण गेला वाहून
मंगळवारी सांयकाळी म्हात्रे पुलावरुन अशीच एका व्यक्तीने उडी मारली होती. त्या व्यक्तीला वाचविण्यात अग्निशमन दलास यश आले होते.