ETV Bharat / city

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? मुलावर नको ती बंधने घालण्याची गरज नाही - तज्ज्ञ - कोरोनाची तिसरी लाट

कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पालकांमध्ये प्रचंड दहशत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची तिसरी लाट आणि मुलांना असलेला धोका, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा मुलांवरील परिणाम आणि संभाव्य धोक्याबाबत आरोग्य यंत्रणेची तयारी याबाबतचा ईटीव्ही भारतचा खास आढावा..

expert-doctors-opinion-that-how-dangerous-the-third-wave-of-corona

author img

By

Published : Jun 1, 2021, 8:27 PM IST

पुणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचे भाकीत होत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण आहे. त्यातच ही लाट मुलांसाठी धोकादायक असल्याच्या भाकिताने तर पालकांमध्ये प्रचंड दहशत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची तिसरी लाट आणि मुलांना असलेला धोका, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा मुलांवरील परिणाम आणि संभाव्य धोक्याबाबत आरोग्य यंत्रणेची तयारी याबाबतचा ईटीव्ही भारत ने घेतलेला हा खास आढावा..

पहिल्या दुसऱ्या लाटेत मुलांमध्ये नगण्य प्रमाण -

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारीचा विचार केला तर मुलांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अंत्यत कमी आढळून आले आहे. या दोन्ही कोरोना लाटे दरम्यान 5 वर्षाखालील बालकांचा विचार केला तर एकूण बाधित रूग्णांच्या 1 ते दीड टक्का इतके राहिले आहे. पहिल्या लाटेतही साधारणपणे 1 ते 1.2 टक्के तर दुसऱ्या लाटेत ही या प्रमाणात अत्यल्प बदल वगळता मोठा बदल झालेला नाही. असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर येते. दुसरीकडे 18 वर्षाखालील मुलांचा विचार केला तर या वयोगटातील एकूण बाधितांच्या 8 ते 10 टक्के इतकी मुले बाधित झाली आहेत.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक?
मुलांमध्ये सौम्य तीव्रता -
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जरी ही मुले कोरोनाने बाधित झाली तरी त्याचे स्वरूप गंभीर नसते. सौम्य असा कोरोना आजार लहान मुलांमध्ये आढळल्याचे देखील दिसून आले आहे. कोरोना होण्याचे प्रमाण आणि त्याची तीव्रता ही लहान मुलांमध्ये कमी असण्याचे कारण म्हणजे, कोरोना व्हायरस हा शरीरात प्रवेश करत असताना त्याला रिसेप्टरची गरज भासते. या रिसेप्टरला चिटकून हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो. मात्र लहान मुलांमध्ये हे रिसेप्टर विकसित झालेले नसतात, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे मुलांमध्ये या आजाराचे गंभीर स्वरूप होताना दिसत नाही. राज्याच्या कोरोना आजाराच्या आकडेवारीवरून एक गोष्ट लक्षात येते की, मुलांमध्ये 10 हजार रुग्ण असतील तर एखादा मृत्यू होतो आणि ते ही इतर कुठले आजार असेल तर मृत्यू होत आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुलांमध्ये कोरोनाचे स्वरूप हे सौम्यच राहिले आहे.
शास्त्रीय आधार नाही -
आता सध्या काही तज्ज्ञ तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत आहेत मात्र ही लाट कधी येईल आणि किती तीव्रतेने येईल याबाबत कोणी भाकीत करू शकत नाही. कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, असे भाकीत केले जात असल्याने भीती व्यक्त होत आहे, मात्र या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार नाही. १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत आहे. त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे. या तर्काला कोणताही आधार नाही.
बालरोगतज्ञाचे टास्क फोर्स -
दरम्यान तिसऱ्या लाटेची शक्यता आणि मुलांना सांगितला जात असलेला धोका या बाबी ठोस नसल्या तरी प्रशासन म्हणून राज्याच्या आरोग्य विभागाने संभाव्य धोके लक्षात घेऊन रणनीती आखली आहे. आरोग्य विभागाने राज्य पातळीवर बालरोगतज्ञाचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे आणि हे टास्क फोर्स लहान मुलांच्या दृष्टीने काय तयारी करावी, गरज लागल्यास लहान मुलांचे आयसीयू कसे असावेत काय सुविधा असाव्यात वार्डात काही बदल करावे का, यावर काम केले जाते आहे. तसेच जर लहान मुलांमध्ये हा आजार पसरला तर त्यासाठी डॉक्टरांचे ट्रेनिग, नर्सेस मेडिकल स्टाफचे राज्यभर ट्रेनिंग सुरू करण्यात आले आहे आणि या निमित्ताने राज्याचा आरोग्य विभाग आपल्याकडे योग्य साधन सुविधा आणि मनुष्यबळ असल्याचे सिद्ध करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.