पुणे - महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर शनिवार आणि रविवारी पूर्णत: बंद राहतील. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून केवळ पार्सल सेवा सुरु राहील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
![Except for essential services within the Pune Municipal Corporation, all other businesses will closed on week end](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-pune-vikend-loukdown-avb-mh10021_19062021094604_1906f_1624076164_822.jpg)
आजपासून पुण्यात विकेंड लॉकडाऊन -
महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि स्वतंत्र प्रशासकीय गट म्हणून मानल्या गेलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार निर्बंधांमध्ये सूट किंवा कठोर निर्बंध याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार आलेल्या आकडेवारीनुसार तसेच, पुण्यातील सध्याच्या परिस्थितीनुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विकेंड कडक लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. हे आदेश आजपासूनच लागू असणार आहेत.
शनिवार, रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु -
पुणे मनपा हदद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा देता येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटमध्ये दिली आहे.