ETV Bharat / city

Eknath Shinde : पुण्यात शिवसेनेत फूट ; राजाभाऊ भिलारे एकनाथ शिंदे गटात सामील

राज्यात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक ( Shiv Sena aggressive in maharashtra ) झालेली पहायला मिळत आहेत. अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड ( MLA office vandalized ) केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्ष चालवणाऱ्या राजाभाऊ भिलारे ( Rajabhau Bhilare ) यांच्या कार्यालयात येऊन देखील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळीमा ( Defamation Eknath shinde) फासली आहे.

author img

By

Published : Jun 25, 2022, 1:48 PM IST

Rajabhau Bhilare Eknath Shinde joins the group
राजाभाऊ भिलारे एकनाथ शिंदे गटात सामील

पुणे - राज्यात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक ( Shiv Sena aggressive in maharashtra ) झालेली पहायला मिळत आहेत. अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड ( MLA office vandalized ) केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्ष चालवणाऱ्या राजाभाऊ भिलारे ( Rajabhau Bhilare ) यांच्या कार्यालयात येऊन देखील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळीमा ( Defamation Eknath shinde) फासली आहे. त्यामुळे भिलारे हे आक्रमक झाले आहे. आता मी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असून एकनाथ शिंदे जिथे जाणार तिथे मी जाणार असल्याचे भिलारे यांनी सांगितले.

राजाभाऊ भिलारे एकनाथ शिंदे गटात सामील

तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले - काल शिवसैनिकांनी नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासत आंदोलन केले होते. आता मंत्री तानाजी सावंत यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, काचांची तावदाने फोडून टाकली आहेत. त्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्याता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज सकाळी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमदाराच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

शिवसैनिक आक्रमक - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवनेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कालपासून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, शिवसैनिकांच्या दोन बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्या. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आक्रमक प्रतिक्रिया दिसू लागल्या होत्या. पुण्यामधील तोडफोड ही त्याचीच परिणीती आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर आता शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पुण्यामध्ये शिवसेना ( Shivsena ) नेते आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिक त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा - शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही- संजय राऊत

हेही वाचा - Amit Shah On Gujrat Riots 2002 : गुजरात दंगल प्रकरणात मोदींवर बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी : अमित शाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.