ETV Bharat / city

शैक्षणीक शुल्क वाढ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात अभाविप'चे पैसा फेको आंदोलन - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिविपीचे आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठातील जवळपास सर्व विभागांचे शैक्षणीक शुल्क दुपटीने वाढवण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क वाढ मागे घेण्यात यावी यासाठी आज सोमवार (दि. 10 ऑक्टोबर)रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील कुलगुरू दालनाच्या बाहेर आंदोलन करत प्रतिकात्मक पैसे फेको आंदोलन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात अभाविप'चे पैसा फेको आंदोलन

author img

By

Published : Oct 10, 2022, 6:01 PM IST

Updated : Oct 10, 2022, 7:08 PM IST

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठातील जवळपास सर्व विभागांचे शैक्षणीक शुल्क दुपटीने वाढवण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क वाढ मागे घेण्यात यावी यासाठी आज सोमवार (दि. 10 ऑक्टोबर)रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील कुलगुरू दालनाच्या बाहेर आंदोलन करत प्रतिकात्मक पैसे फेको आंदोलन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात अभाविप'चे पैसा फेको आंदोलन

या विषयाला घेऊन ३० सप्टेंबर ला अभाविप कडून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांना कुलसचिव प्रफुल्ल पवार, परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांच्या समक्ष अभाविप च्या वतीने निवेदन देण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. मात्र, या ठिकाणी ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या अधिक आहे. प्रत्येकच विद्यार्थ्याला हे अवाढव्य पणे वाढलेले शुल्क भरणे शक्य नाही अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी नोंदवली आहे.

विद्यापीठात अनेक विद्यार्थी "कमवा-शिका" अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करतात. विद्यापीठाकडून यावर्षी अनेक कोर्सेसच्या शुल्कामध्ये अवाजवीपणे वाढ करण्यात आली आहे. पुंबा विभागातील "बी बी ए" या कोर्स ची फी १६ हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर, गणित विषयाच्या विद्यार्थ्यांकडून लॅबोरेटरी शुल्क आकारण्यात आली आहे. एम. कॉम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचीही शुल्क अवाजवी वाढवण्यात आली आहेत. शुल्कामध्ये अचानक केलेला हा बदल अवाजवी आहे. विद्यार्थी एवढी अवाढव्य शुल्क भरू शकणार नाहीत. ही वाढ रद्द करावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याच यावेळी अभाविपचे अनिल ठोंबरे यांनी म्हटले आहे.

Last Updated : Oct 10, 2022, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.