पुणे :- नवाब मलिक यांनी आत्तापर्यंत जे डॉक्युमेंट मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणले आहे. त्याला काही ना काही तथ्य आहे त्यात काही ना काही प्रूफ आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी आज जो आरोप केला आहे तो विना प्रूफ केलेला नाही. त्यात अपहरण असा काही विषय नाही.पण कधीकधी काही लोकं ब्लॅकमेलिंग करतात त्यामुळे हा विषय असू शकतो, असेही नवाब मलिक म्हणाले.
पदाचा गौरवापर किंवा व्यक्तिगत हितासाठी ते करायचं असल्यास एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या मुलाला अडकून मार्ग काढण्यासाठी आम्ही त्याला मदत करू शकतो या हेतूने त्याला ब्लॅकमेलिंग हे होऊ शकतो. पण त्यात प्रूफ लागतील. नवाब मलिक हे योग्य वेळेला प्रूफ देतील. अशी घटना जर होत असतील आणि केंद्र सरकारच्या एका एजन्सीमध्ये एखादा व्यक्ती असेल आणि तो व्यक्ती त्या पदाचा गैरवापर करताना राज्याचा विरोधी पक्ष त्या व्यक्तीची बाजू घेत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रथा कुठल्याही अधिकाराच्या बाबतीत घडू नये.सगळ्यांनी याची खबरदारी घेतली पाहिजे असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
भाजपात खळबळ उडाल्यासारखे वाटते
या प्रकरणात कालपासून ज्या व्यक्तीचा नाव समोर येत आहे. त्या व्यक्तीला मी नावानिशी ओळखत नाही. कधी कुठं भेटलो तर माहीत नाही कारण लोक भेटत असतात. पण ज्या पद्धतीने नवाब मलिक हे प्रूफ देत आहे. त्या प्रूफवरून कुठंतरी भारतीय जनता पक्षात खळबळ उडाल्या सारखं वाटत आहे.आणि ते कुठंतरी पार्टीला किंवा व्यक्तीला आपल्या बाजूला जोडण्याचा प्रयत्न करतील. पण कुठलीही गोष्ट करताना प्रूफशिवाय करू नये. कुठंतरी याचा शेवट व्हावा आणि योग्य व्यक्तीवर कारवाई करण्यात करावी असेही रोहित पवार म्हणाले.
भाजपने महाराष्ट्रासाठी काय काय केलं हे सांगावं
विकास किती केला कोणाला काय मदत केली आहे. याबाबत आकडेवारी देण्यात येईल. मला विरोधी पक्षाच्या नेत्यांना एवढंच विचारायचं आहे की राज्याच्या हितासाठी तुम्ही केंद्र सरकारला कितीवेळा पत्रव्यवहार केला. पूरपरिस्थिती असताना किती वेळा राज्याला मदत केली. इतर राज्यांना केंद्र सरकार मदत करताना आपल्या राज्यातील विरोधी पक्ष एवढं शांत का आहेत. केंद्रात त्यांचा कोणी ऐकत नसेल म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी 2 वर्षात काय काय केलं हे त्यांनी सांगावं असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - 'मला ड्रग्ज पेडलरची बायको म्हणून हिनवलं', नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र
संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल
नगरची जी काल घटना घडली त्या घटनेच्याबाबतीत कोणीही राजकारण करू नये. तिथं गेल्यानंतर त्या भागातील पाहणी केल्याशिवाय कोणीही काहीही वक्तव्य करू नये, असेही वैयक्तिक मत आहे. तिथं पालकमंत्री हे स्वतः हा लक्ष घालून आहे.कमेटी नेमण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरात लवकर येईल आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असेही पवार म्हणाले.
एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळालं पाहिजे
एसटी कामगारांच्याबाबतीत सरकार संवेदनशील असून एसटीच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर आणि वेळेवर पगार व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकार चे नेते प्रयत्न करत आहे. एस टी कामगारांचा पगार वेळेवर व्हावा हा माझा वैयक्तिक मत आहे. मला कामगारांना विनंती करायची आहे की सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी या कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असेही पवार म्हणाले.
यूपीच्या निवडणुकांमुळे डिझेलचे दर कमी केले का
गेल्या 6 वर्षात तिप्पट दर आधीच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर लावले आहे. आतापर्यंत अतिरिक्त 8 लाख कोटी गोळा केले तेव्हा राज्यातील भाजप कुठे होतं.असा सवाल करत लोकसभेच्या पोटनिवडणुका होतात तेव्हा दर कमी होतात आणि आताही यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे दर कमी होताहेत का ? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्यातील भाजपच्या लोकांना फक्त राजकारण करणं माहीत आहे आपत्तीच्या वेळी आपल्या राज्याला केंद्राकडून किती मदत मिळतेय हे राज्यातील भाजपच्या लोकांनी बघावं असं देखील यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा - उडता पंजाब, प्रमाणे 'उडता महाराष्ट्र' करण्याचा प्रयत्न; नवाब मलिकांचे समीर वानखेडेवर आरोप