ETV Bharat / city

Pune Crime: नवरा बायकोच्या भांडणात दारुड्या बापाने 8 वर्षाच्या मुलीवर झाडल्या गोळ्या - parents fight in pune

Pune Crime पुण्यातील नऱ्हे येथे नवरा बायकोच्या भांडणात दारुड्या बापाने 8 वर्षाच्या मुलीवर गोळ्या झाडल्या. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पांडुरंग तुकाराम उभे ( वय ३८ ) या व्यक्तीने स्वतःच्या आठ वर्षाच्या मुलीवर गोळ्या झाडल्या आहेत. Drunken Builder Shot 8 Year Old Daughter

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Sep 24, 2022, 5:49 PM IST

पुणे: पुण्यातील नऱ्हे येथे नवरा बायकोच्या भांडणात दारुड्या बापाने 8 वर्षाच्या मुलीवर गोळ्या झाडल्या. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पांडुरंग तुकाराम उभे ( वय ३८ ) या व्यक्तीने स्वतःच्या आठ वर्षाच्या मुलीवर गोळ्या झाडल्या आहेत. Drunken Builder Shot 8 Year Old Daughter

दारू पिण्याचे प्रमाण वाढले पांडुरंग उभे हा बांधकाम व्यवसायिक आहे. त्यातूनच परवाना असलेली बंदूक आहे. सध्या त्याचा व्यवसाय मंदीमध्ये असल्याने पांडुरंग आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे आधीच दारूचे व्यसन असलेल्या पांडुरंगाचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. शुक्रवारी रात्री तो दारु पिऊन घरी आला. त्यावरुन त्याच्यामध्ये व पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. तुमच्यामुळे मला बाहेरच्या लोकांचा मार खावा लागतो. आज तुम्हाला संपवून टाकतो, असे म्हणत पांडुरंगने आपली परवाना असलेली बंदूक पत्नीच्या दिशेने रोखली.

थेट मुलीवर गोळी झाडली आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु असल्याचे पाहून जवळच उभी असलेली 8 वर्षाची मुलगी ओरडत मध्ये आली. पप्पा मम्मीला मारू नका अशी विनवणी मुलगी करत होती. मात्र दारूच्या नशेत धुंद असलेल्या निर्दयी बापाने कसलीही दया न दाखवता थेट मुलीवर गोळी झाडली. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नराधम बापाच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात Sinhagad Police Station गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

परिमंडळ तीनच्या पोलीस आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, पोलीस निरीक्षक शैलेश संखे, जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, अस्मिता लाड, अशोक सणस आदी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.