ETV Bharat / city

Doctor advice for prevention from Omicron : ओमायक्रोनबद्दल भीती बाळगू नका आणि गाफीलही! डॉक्टरांनी 'हा' दिला सल्ला - Doctor advice for prevention from Omicron

डॉ. प्रितम राजेश लांडगे यांच्या मते ओमायक्रोन हा फार भीतीदायक ( Doctor advice for prevention from Omicron ) नाही. तरुणांनी काळजी करण्याचे कारण नाही, मात्र नियम सर्वानी पाळावेत. तर, वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच दररोज योगासने आणि प्राणायाम केल्याचा फायदा होत ( benefit of Yaga for corona positive patient ) असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रितम राजेश लांडगे
डॉ. प्रितम राजेश लांडगे
author img

By

Published : Jan 13, 2022, 7:57 PM IST

Updated : Jan 13, 2022, 8:40 PM IST

पिंपरी-चिंचवड ( पुणे ) - ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रोनबद्दल काय काळजी घ्यायला हवी, याबद्दल डॉ. प्रितम राजेश लांडगे यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली आहे.

डॉ. प्रितम राजेश लांडगे यांच्या मते ओमायक्रोन हा फार भीतीदायक नाही. तरुणांनी काळजी करण्याचे कारण नाही, मात्र नियम सर्वानी पाळावेत. तर, वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच दररोज योगासने आणि प्राणायाम केल्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ओमायक्रोनबद्दल भीती बाळगू नका

हेही वाचा-Sanjay Raut Meets Rakesh Tikait : खासदार संजय राऊत यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट

ही आहेत ओमायक्रॉनची लक्षणे- ( omicron patient symptoms )

डॉ. प्रितम लांडगे म्हणाले की, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, भूक न लागणे आणि अशक्तपणा हे ओमायक्रोनची विशेष लक्षणे आहेत. शक्यतो, गंध न येणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षण सध्या रुग्णामध्ये आढळत नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु, बाधित रुग्णांनी योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. घरात विलगीकरणात असाल तर व्हिटॅमिन सीचे प्रमाण असलेली फळ खावीत. तसेच, पालेभाज्यांचे सूप प्यावे. जेणेकरून ओमायक्रोन तुमच्यावर जास्त प्रभाव टाकू शकणार नाही.
हेही वाचा-Santosh Parab Attack Case : नितेश राणे यांच्या जामिनावर 17 जानेवारी मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल

या व्यक्तींनी अधिक घ्यावी काळजी ( precautions for preventions from omicron )

वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घावी, असे डॉ. लांडगे यांनी सांगितले आहे. ज्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार आहेत त्यांनी नेहमी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची काळजी घ्यावी.
हेही वाचा-VIRAL : "दादागिरी कधी थांबणार".. मारहाण झालेल्या तरुणाने युट्यूबवर व्हिडिओ टाकून केला सवाल

गृह विलगीकरणात असल्यास हे खावे ( Food in isolation for corona positive )

घरातच उपचार घेत असाल आणि सौम्य लक्षण असतील तर तुम्ही अंडी, मटण, चिकन हे खावे. तर, व्हेजिटेरिअन असलेल्या व्यक्तींनी फळ, पालेभाज्यांचे सूप घ्यावे, असे डॉ. प्रितम यांनी सांगितले आहे.

तरुणांच्या मनातील भीती कमी झाली
कोरोनाबद्दलची भीती कमी झाल्याचे ऋषिकेश जाधवर या तरुणाने म्हटले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना सोबत जगत आहोत. मात्र, कोरोना नियमांचे पालन सर्वानी करायला हवे, असे या तरुणाने म्हटले आहे.

कोरोना बाधित पण..गृहविलगीकरणात असाल तर या डॉक्टरांशी संपर्क करू शकता ( free consultation for corona patient on phone )
तुम्ही कोविड बाधित असाल तर जास्त मानसिक तणाव घेऊ नका. कारण, डॉ. प्रितम लांडगे हे गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना फोनवरून मोफत सल्ला देत आहेत. त्यांनी अनेकांना कोविड मुक्त केले आहे. कोणती औषध घ्यावीत? कोणत्या चाचण्या कराव्यात? सी.टी स्कॅन करणे गरजेचे आहे का? याविषयी डॉ. प्रितम राजेश यांच्याशी (7249433334) दूरध्वनीवर संपर्क करून विनामूल्य सल्ला घेऊ शकता.

Last Updated : Jan 13, 2022, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.