ETV Bharat / city

'पुण्यात भाजप नागरसेवकाकडून केंद्राच्या लसीकरण प्रमाणपत्रासह स्वतःचेही प्रमाणपत्र वाटप' - केंद्र सरकारचे कोरोना लसीकरण प्रमाणपत्र

लसीकरण करणाऱ्या नागरिकांचा गोळा केलेला डाटा सत्ताधारी भाजपने बेकायदेशीररित्या मिळवून केंद्र सरकारच्या प्रमाणपत्रासह स्वतःचे प्रमाणपत्र बनवून लसीकरण करणाऱ्या नागरिकांना पाठवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Centre's vaccination certificate
Centre's vaccination certificate
author img

By

Published : May 22, 2021, 4:40 PM IST

Updated : May 22, 2021, 5:10 PM IST

पुणे - लसीकरण करणाऱ्या नागरिकांचा गोळा केलेला डाटा सत्ताधारी भाजपने बेकायदेशीररित्या मिळवून केंद्र सरकारच्या प्रमाणपत्रासह स्वतःचे प्रमाणपत्र बनवून लसीकरण करणाऱ्या नागरिकांना पाठवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवक कर्णे गुरुजी यांच्याकडून केंद्र सरकारचे लसीकरण प्रमाणपत्र कसे पाठविले जात आहे ? तसेच संबंधित नगरसेवकाने स्वत:चे छायाचित्र असलेले प्रमाणपत्रही नागरिकांना पाठवत प्रचारच सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

पुण्यात नगरसेवकाच्या नावाने कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र वाटप
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलिसांच्या सायबर सेलला निवेदन -
यासंदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलिसांच्या सायबर सेलला निवेदन देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आणि नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नागरीकांना लसीकरणासाठी कोविन अ‌ॅपवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. मोबाईल क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांकही ऑनलाईन अर्जात नमूद करावा लागतो. लस घेतल्यानंतर संबंधित नागरीकाला लस घेतल्याचा आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोबाईल क्रमांकावर 'ओटीपी नंबर पाठविला जातो. हा ओटीपी नंबर कोविन अ‌ॅपवर टाकल्यानंतरच प्रमाणपत्र पाहता येते आणि डाऊनलोड करता येते. परंतु, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवकाकडून नागरिकांना व्हॉट्सअ‌ॅपवर केंद्र सरकारचे प्रमाणपत्र कसे पाठविले जाते हा प्रकार संशयास्पद आहे. असे जगताप यांनी यावेळी म्हटले आहे.

Centre's vaccination certificate
भाजप नगरसेवकाकडून वितरीत करण्यात येणारे प्रमाणपत्र
लसीकरणाचा डाटा भाजपकडे कसा आला ?
लसीकरण झालेल्या नागरिकांचा विविध केंद्रावर डाटा जमा झालेला आहे. हा डाटाच भाजपच्या नगरसेवकांनी मिळविला आहे. त्यांना हा डाटा कोणी पुरविला याची चौकशी करावी, संबंधित नगरसेवक आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांना दिले. मोबाईल क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांक हा महत्वाचा डाटा आहे. तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार, महापालिका प्रशासनाने जतन करणे आवश्यक आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाला, व्यावसायिक आस्थापनांना देता येत नाही. असे असतानाही शहरात विविध केंद्रांवर लसीकरण झालेल्या नागरीकांचा डाटा काही नगरसेवकांनी बेकायदेशीररीत्या मिळविला आहे. नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर केंद्र सरकारचे व नगरसेवक स्वतःचा प्रचार करणारे प्रमाणपत्र नागरिकांना पाठवित आहेत.असा आरोपही यावेळी जगताप यांनी केला आहे.

Last Updated : May 22, 2021, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.