ETV Bharat / city

जो पुण्याचे पाणी कमी करेल, पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - देवेंद्र फडणवीस

पुण्याचे पाणी कोणीही पळवण्याचा प्रयत्न करू नये. जो पुण्याचे पाणी कमी करेल पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 3, 2021, 10:06 PM IST

Updated : Dec 3, 2021, 10:17 PM IST

पुणे - पुण्याचे पाणी कोणीही पळवण्याचा प्रयत्न करू नये. जो पुण्याचे पाणी कमी करेल पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पुणे भाजपतर्फ मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन (New Pune BJP Office) देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस

पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली 23 गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन 1460 एमएलडी पाणी खडकवासलातून आणि 380 एमएलडी पाणी भामा-आसखेडमधून पुरवठा होतो. परंतु, पाटबंधारे विभागाकडून पोलीस बंदोबस्तात पुण्याचे पाणी कमी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता.

महापालिकेत विक्रमी जागा निवडून आणू -

भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. हे कार्यालय फक्त भाजपचे नव्हे तर पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणार आहे. येणाऱ्या काळात भाजप पुणे महानगरपालिकेत विक्रमी जागा निवडूण आणू, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.

Last Updated : Dec 3, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.