ETV Bharat / city

Devendra Fadnavis news pune : पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सूरू.. सोमैयांवर झालेल्या हल्ल्यावर फडणवीसांचा आरोप - किरीट सोमैया हल्ला फडणवीस प्रतिक्रिया

भाजप नेते किरीट सोमैया ( Shivsena attack on kirit somaiya in mumbai ) यांना झेड सेक्युरिटी आहे. त्यांनी कळवले होत की ते पोलीस स्टेशनला येणार आहे. त्यांनी हल्ल्याची कल्पना देखील पोलिसांना ( Devendra fadnavis on attack on kirit somaiya ) दिली होती. तरीही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. उलट जाणीवपूर्वक शिवसैनिक गुंडांना परवानगी दिली. पोलिसांच्या संरक्षणात गुंडागर्दी चाललेली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis news pune ) यांनी दिली.

Devendra Fadnavis news pune
फडणवीस प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 24, 2022, 7:39 AM IST

पुणे - भाजप नेते किरीट सोमैयांवर ( Shivsena attack on kirit somaiya in mumbai ) मुंबईत शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांना झेड सेक्युरिटी आहे. त्यांनी ( kirit somaiya news mumbai) कळवले होत की ते पोलीस स्टेशनला येणार आहे. त्यांनी हल्ल्याची कल्पना देखील पोलिसांना ( Devendra fadnavis on attack on kirit somaiya ) दिली होती. तरीही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. उलट जाणीवपूर्वक शिवसैनिक गुंडांना परवानगी दिली. पोलिसांच्या संरक्षणात गुंडागर्दी चाललेली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis news pune ) यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस

हेही वाचा - Bail Or Jail To Ranas : राणा दाम्पत्याला उद्या जामीन की तुरुंगवास? काय सांगतो कलम १५३ (अ), जाणून घ्या सविस्तर

मुंबईत राणा दाम्पत्याने ( Devendra fadnavis on navneet rana ) काल केलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना अटक केली. यानंतर रात्री त्यांना भेटण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमैया यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी चपला भिरकावत जोरदार हल्ला चढविला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदर मत व्यक्त केले.

लोकशाही पायाखाली तुडवली जात आहे - पोलिसांना शरम वाटली पाहिजे. कळवल्यानंतरही सोमैयांना संरक्षण दिले जात नाही. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची अब्रू घालवली आहे. देशातील सर्वोत्तम पोलीस सरकारच्या दबावाखाली वागत आहे. लोकशाही पायाखाली तुडवली जात आहे. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे, असे फडणवीस म्हणाले.

किरीट सोमैया हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार - राणा दाम्पत्यावर फडणवीस म्हणाले की, सर्व कलम जामीनपात्र असताना देखील एका महिलेला कायदा पायदळी तुडवून पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. हे अत्यंत गंभीर बाब आहे. किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री यांना पत्र पाठवणार असून त्यांना पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणार आहे. आम्हाला हे सरकार घाबरवू शकत नाही. आम्ही घाबरलो असे समजू नका. आम्ही कायदे पाळतो, असे देखील फडणवीस म्हणाले.

जी लोक या सरकारचे घोटाळे बाहेर काढत आहेत, त्यांना जिवे मारण्याची संस्कृती यांनी सुरू केली आहे. या प्रवृत्तीला आम्ही घाबरणार नाही. आम्ही जशात तसे उत्तर द्यायला तयार आहोत. 'ईट से ईट बजा देंगे' असे यावेळी फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Ramdas Athavale On Loudspeaker Controversy : मशिदीवरचे भोंगे उतरवले जाणार नाहीत - रामदास आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.