ETV Bharat / city

Attack On Kirit Somaiya : 'राज्यात झुंडशाहीचे राजकारण, पोलिसांवर क्रॉस मिस कंडक्टची कारवाई करा' - शिवसैनिक किरीट सोमैया हल्ला प्रकरण अपडेट

भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर काल मुंबईत जो हल्ला ( Shivsainik Attack On Kirit Somaiya ) झाला तो पोलिसांसमोर झाला पण पोलीस मात्र बघत राहिले आणि म्हणून पोलिसांवर क्रॉस मिस कंडक्टची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Reaction On Kirit Somaiya Attack ) यांनी केली आहे.

Devendra Fadnavis Reaction On Kirit Somaiya Attack

author img

By

Published : Apr 24, 2022, 3:51 PM IST

Updated : Apr 24, 2022, 4:33 PM IST

पुणे - भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर काल मुंबईत जो हल्ला ( Shivsainik Attack On Kirit Somaiya ) झाला तो पोलिसांसमोर झाला पण पोलीस मात्र बघत राहिले आणि म्हणून पोलिसांवर क्रॉस मिस कंडक्टची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Reaction On Kirit Somaiya Attack ) यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस यंत्रणेवर हल्लाबोल - किरीट सोमैया यांच्यावर जो हल्ला झाला तो पोलीस स्टेशनच्या जवळ झाला म्हणून कालची गोष्टी ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे, असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच पोलीस स्टेशनच्या जवळ हल्ला होतो याचा अर्थ असा की या हल्ल्याला पोलिसांचे समर्थन आहे. पोलीस हा हल्ला रोखण्यात नाकाम झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर क्रॉस मिस कांडक्टची कारवाई झाली पाहिजे, असा हल्लाबोलही त्यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेवर केला.

म्हणून राष्ट्रपती राजवटीची मागणी - दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सध्याची परिस्थिती काय आहे, हे पाहिले आहे, सामान्य लोकांना वाटतंय की राज्यात राष्ट्रपती लागवट लागावी मात्र राष्ट्रपती लागवट लावायचा निर्णय राज्यपाल यांचा असतो, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

किरीट सोमैयांवर झाला होता हल्ला - शनिवारी रात्री सोमैया राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. राणा दाम्पत्यांना भेटल्यानंतर ते परतत असताना वाटेतच काही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला. पोलिसांनी परिस्थीती नियंत्रणात आणली आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी किरीट सोमैया हे वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती.

हेही वाचा - Rana couple sent to judicial custody : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहचा गुन्हा

Last Updated : Apr 24, 2022, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.