ETV Bharat / city

Ajit Pawar on Silver Oak Attack : 'मीडियाला कळलं, पोलिसांना का नाही?' अजित पवारांची नाराजी

महाराष्ट्रात कधीही अशी घटना झाली नाही. पवार साहेब 60 वर्षापासून समाजकार्य करत आहे. त्यांनी अनेक एसटीच्या मेळाव्यात सहभाग घेतला आहे. आपलं विरोध करून काहीही होणार नाही. हे तर कोर्टाने निर्णय दिला होता. आम्ही तर ठरवलं होतं की 1 तारखेच्या पर्यंत जे येतील त्यांना घेऊ बाकीच्यावर कारवाई करू अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Apr 9, 2022, 9:49 AM IST

Updated : Apr 9, 2022, 12:29 PM IST

पुणे - काल एसटी कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरी चप्पल आणि दगड फेकण्यात आले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, की एसटी कर्मचारी असा विचार करणारे नाही. नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातली गेली. कोणतीतरी शक्ती त्यांच्या पाठीशी होती. ते शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलीस तश्या पद्धतीने कामाला देखील लागले आहे. पोलीस प्रशासन यामागील मास्टर माईंड कोण आहे, याचा नक्कीच शोध घेतील असे यावेळी पवार म्हणाले. औंध येथे एका कार्यक्रमानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते यावेळी ते बोलत होते.

'मीडियाला कळलं, पोलिसांना का नाही?'

पोलिसांचे देखील अपयश - अजित पवार म्हणाले, मला एका गोष्टीची गम्मत वाटते की दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर गुलाल उधळत मिठाई वाटप करण्यात आली. ज्यांनी कोणी आंदोलन केले होतं, त्यांना खुप मोठं यश मिळालं आहे असं दाखवलं. मग एवढं सर्व होत असताना सिल्व्हर ओकवर जाण्याचे काहीही कारण नव्हते. मग आत्ता याचा काय अर्थ लावायचा. पण एक गोष्ट आहे की पोलीस प्रशासन माहिती मिळवण्यात कमी पडले. आंदोलनाची माहिती मिडियाला मिळते मात्र पोलिसांनी मिळत नाही. हे पोलिसांचे अपयश असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. याचीदेखील चौकशी सुरू असलयाचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - Sanjay Raut on Silver Oak Attack : 'राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र'

चिथावणीखोर वक्तव्य - महाराष्ट्रात कधीही अशी घटना झाली नाही. पवार साहेब 60 वर्षापासून समाजकार्य करत आहे. त्यांनी अनेक एसटीच्या मेळाव्यात सहभाग घेतला आहे. आपलं विरोध करून काहीही होणार नाही. हे तर कोर्टाने निर्णय दिला होता. आम्ही तर ठरवलं होतं की 1 तारखेच्या पर्यंत जे येतील त्यांना घेऊ बाकीच्यावर कारवाई करू. पण कोर्टाच्या निर्णयाने जे निर्णय दिलं ते आम्ही मान्य केलं. शेवटच्या क्षणापर्यंत सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने होते. तरीही कोण कशी चितावणीखोर वक्तव्य करत होते हे सर्वांनी पाहिलं आहे.

Last Updated : Apr 9, 2022, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.