ETV Bharat / city

पुण्यात वातावरण बदलामुळे सर्दी, खोकल्यांचे रुग्ण वाढले; 'ही' घ्या काळजी - चिकनगुनिया रुग्ण पुणे

पुणे शहरात रोजच वातावरण बदलत आहे. पाऊस, हवेतील गारवा तसेच दुपारी होत असलेल्या गरमीमुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला यांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू तसेच चिकनगुनियासारखे (Dengue and Chikungunya) आजार होत आहेत.

Dr. Avinash Bhondwe
डॉक्टर अविनाश भोंडवे
author img

By

Published : Nov 24, 2021, 6:34 PM IST

Updated : Nov 24, 2021, 7:40 PM IST

पुणे - पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या घटली आहे. मात्र, शहरात रोजच वातावरण बदलत आहे. पाऊस, हवेतील गारवा तसेच दुपारी होत असलेल्या गरमीमुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला यांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू तसेच चिकनगुनियासारखे (Dengue and Chikungunya) आजार होत आहेत. शहरात दहा रुग्णांमागे चार ते पाच रुग्ण हे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे आढळून येत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondwe) यांनी दिली आहे.

डॉक्टर अविनाश भोंडवे
  • शहरात डेंग्यूची साथ -

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. तसेच मध्येच हवेत गारवा जाणवतो. अशा संमिश्र वातावरणामुळे बाह्यरुग्ण विभागात सर्दी, ताप, खोकला याची लक्षणे असलेले रुग्ण येत आहेत. शहरात ऑक्टोबरच्या मध्यापासून ते आतापर्यंत थंडी ही पहिल्यासारखी पडलेली नाही. शहरात काही दिवसांपासून रात्री कधी थंडी, तर कधी गरम तर दिवसा कधी पाऊस असच सत्र हे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून काही आजार हे निश्चितच वाढले आहेत. स्वच्छ पाण्यात आढळणाऱ्या डासांपासून डेंगू आणि चिकणगुणियाच्या आजारात वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात डेंग्यूची साथ आली आहे. एवढ्याप्रमाणात शहरात डेंग्यूचे रुग्ण हे सापडत आहेत. हा डेंग्यू हिमेरिजेक डेंग्यू नसल्याने यात कोणीचाही मृत्यू होत नाही. हा डेंग्यू साधारण 8 ते 10 दिवसात बरा होतो. परंतु, चिकणगुनिया जो पूणे शहरात मागच्या एक ते 2 वर्षात काहीच नव्हता त्याचे रुग्ण मात्र शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे देखील यावेळी भोंडवे म्हणाले.

  • अशी घ्या काळजी -

शहरातील परिस्थिती पाहिली तर डासांमुळे आजार हे खूप पसरत आहेत. यासाठी आपल्याला विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येकाने घरात तसेच सोसायटीच्या परिसरात स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने पाऊस आला तर त्या पावसात भिजू नये, तसेच फ्रिजमधील पदार्थ खाण्यास टाळावे, मसालेदार पदार्थ खाऊ नये आणि विशेष म्हणजे सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास बाहेरील औषधे न घेता डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधे घेतली पाहिजे, अशी खबरदारी सर्वसामान्य नागरिकांनी घेतली पाहिजे, असे देखील भोंडवे यावेळी म्हणाले.

Last Updated : Nov 24, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.