ETV Bharat / city

बालगंधर्वच्या बाहेर कलाकारांची निदर्शने, नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे सुरू करण्याची मागणी

सरकारने नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे त्वरित सुरू करावीत, यासाठी नाट्य परिषदेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले. पुण्यातील कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या पुण्यातील लावणी, लोकधारा, नाट्य-सिने, एकपात्री, जादूगर, नृत्य, साऊंड लाइट, बॅक स्टेज कलाकार तसेच लोककलावंतांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. तातडीने नाट्यगृह सुरू करुन या कलाकारांना जीवदान द्यावे, असी मागिणी करण्यात आली.

Demand for artists to start theaters
बालगंधर्वच्या बाहेर कलाकारांची निदर्शने
author img

By

Published : Sep 8, 2020, 4:55 PM IST

Updated : Sep 8, 2020, 7:51 PM IST

पुणे - पाच महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊनमुळे नाट्यगृहांसह विविध सांस्कृतिक केंद्रे बंद आहेत. कार्यक्रम होत नसल्याने कलाकार अडचणीत आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे त्वरित सुरू करावीत, या मागणीसाठी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे नृत्य परिषद महाराष्ट्रच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

बालगंधर्वच्या बाहेर कलाकारांची निदर्शने

पुणे हे सांस्कृतिक माहेरघर असून कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या पुण्यातील लावणी, लोकधारा, नाट्य-सिने, एकपात्री, जादूगर, नृत्य, साऊंड लाइट, बॅक स्टेज कलाकार तसेच लोककलावंतांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, हाताला काम द्या खिशाला दाम द्या, या मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आलं, अशी माहिती नृत्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.

Demand for artists to start theaters
बालगंधर्वच्या बाहेर कलाकारांची निदर्शने

गेल्या 5 महिन्यांपासून विविध संस्था, संघटनांच्यावतीने कलाकारांना मदत करण्यात आली आहे. शासनाला मनोरंजन कार्यक्रमातून कर रुपात मोठं उत्पन्न मिळत असते. शासनाने जबाबदारी म्हणून या कलाकारांच्या मागे उभे राहायला हवं. या पाच महिन्यांमध्ये अनेक सण-उत्सव येऊन गेले. निदान या कलाकारांना नवरात्रीचे कार्यक्रम तरी मिळावेत, अशी अपेक्षाही यावेळी मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली.

Demand for artists to start theaters
बालगंधर्वच्या बाहेर कलाकारांची निदर्शने

नृत्यावर अवलंबून असलेल्या कलावंतांनी जगायचं कसं? जत्रा गेल्या, यात्रा गेल्या, सांगा आम्ही पोट भरायचं कस? असे विविध फलक घेऊन या कलाकारांनी आंदोलन केले.

Last Updated : Sep 8, 2020, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.