ETV Bharat / city

Pune Mosque : पुण्यातील 'या' पाच मशिदींचा मोठा निर्णय!

पेठांमधील 5 मशिद ट्रस्टनी ( 5 Masjid Trust in Peth Pune ) अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाच मशिदींच्या मौलवांनी ईदच्या दिवशी डीजे न ( Decision For DJ on Eid day ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. डीजेला जितके पैसे लागतील तितके पैसे वाचवून ते गरिब आणि गरजूंच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सामाजिक संदेश देता यावा. सोबत अशा सामाजिक कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे माजी नगरसेवक युसूफ शेख ( Former councilor Yusuf Sheikh ) यांनी संगितले आहे.

कमिटी बैठक
कमिटी बैठक
author img

By

Published : Apr 28, 2022, 3:51 PM IST

Updated : Apr 28, 2022, 4:00 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापल आहे. अशातच पुण्यातील पेठांमधील 5 मशिद ट्रस्टनी ( 5 Masjid Trust in Peth Pune ) अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाच मशिदींच्या मौलवांनी ईदच्या दिवशी डीजे न ( Decision For DJ on Eid day ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. डीजेला जितके पैसे लागतील तितके पैसे वाचवून ते गरिब आणि गरजूंच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सामाजिक संदेश देता यावा. सोबत अशा सामाजिक कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे माजी नगरसेवक युसूफ शेख ( Former councilor Yusuf Sheikh ) यांनी संगितले आहे.

प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक

'शासनाच्या नियमांचे पालन करणार' : आम्ही लोहियानगर परिसरातील पाच मशिदींची एक कोअर कमिटी तयार केली आणि त्यांच्या इमाम आणि कार्यकर्त्याची समुदायातील इतर वरिष्ठ सदस्यांसह बैठक घेतली. ईदच्या उत्सवादरम्यान डीजे न लावण्याचा निर्णय घेतला, अस देखील शेख यांनी यावेळी सांगितले. उत्सवादरम्यान डीजे म्युझिक सिस्टीम खरेदी करण्यासाठी जमा होणारा निधी परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी वापरला जाईल, असेही शेख म्हणाले. दरम्यान, लोहिया नगर परिसरातील सर्व पाचही मशिदी या ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात आणि अजान दरम्यान आवाज नेहमी कमी ठेवला जातो, असा दावा देखील शेख यांनी केला आहे. भारतीय अंजुमन दारुस सलाम, खतीजा मस्जिद, अजिना मस्जिद आणि मोहंमदिया मस्जिद या पाचही मशिद ट्रस्टने ईदच्या दिवशी डिजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - Raj Thackeray's Tweet : महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'- राज ठाकरे

Last Updated : Apr 28, 2022, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.