ETV Bharat / city

कोरोना अपडेट : सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरात कोरोनाने एकही मृत्यू नाही - पुणे कोरोना न्यूज

कोरोना बाधितांची संख्यादेखील गेल्या काही दिवसात झपाट्याने कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रूग्णालयात १६३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Corona Update
Corona Update
author img

By

Published : Oct 21, 2021, 10:18 PM IST

पुणे - पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. आज दिवसभरात शहरात ७९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात ८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आनंदाची बाब म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी आज शहरात कोरोनाने एकही रूग्ण दगावला नाही.

बाधितांची संख्या कमी

कोरोना बाधितांची संख्यादेखील गेल्या काही दिवसात झपाट्याने कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रूग्णालयात १६३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या ९८४ इतकी आहे. गेल्या दीड वर्षात आतापर्यंत पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या पाच लाख तीन हजार ५४८ इतकी आहे. यामधील चार लाख ९३ हजार ४९७ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.