पुणे - गौरवशाली परंपरा असणार्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) यंदाच्या दीक्षांत समारंभावर कोरोनामुळे मर्यादा येणार आहेत. या दीक्षांत समांरभ सोहळ्याला प्रशिक्षणार्थींच्या पालकांना मुकावे लागणार आहे. हा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडणार असल्याची माहिती प्रबोधिनीतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 30 मे रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
एनडीएतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लष्करात सामील होण्यापूर्वी मोठ्या दिमाखात दीक्षांत समारंभ साजरा केला जातो. हा समारंभ पाहण्यासाठी लष्काराच्या तिन्ही दलातील उच्चपदस्थ अधिकारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहत होते.
परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या समारंभ सोहळ्यावर मर्यादा आल्या आहेत. संचलन सोहळा पाहण्यासाठी प्रशिक्षणार्थींचे पालक आवर्जुन हजेरी लावतात. मात्र, यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून पालकांना उपस्थित राहता येणार नाही. शिवाय हा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडणार असल्याची माहिती संरक्षण प्रबोधिनीच्या वतीने देण्यात आली आहे.