ETV Bharat / city

Murder in Pune : पुण्यात भरदिवसा बिल्डरची आर्थिक व्यवहारावरून गोळ्या झाडून हत्या; संशयित ताब्यात - Sameer Shaikh death by firing

समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या ( Sameer Shaikh death by firing ) तरुणाचे नाव आहे. तो काँग्रेस पक्षाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( Bharati university Police station ) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

काँग्रेस कार्यकर्ता
काँग्रेस कार्यकर्ता
author img

By

Published : Dec 6, 2021, 4:25 PM IST

Updated : Dec 6, 2021, 4:49 PM IST

पुणे - राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यात गोळीबार करून तरुणाची ( Young man shot dead in Pune ) भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा हॉटेलसमोर दोघांनी ( Young man shot near Bharati University area ) दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार (daylong firing in Pune ) केला आहे. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. समीर मनूर शेख असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे.

समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या ( Sameer Shaikh death by firing ) तरुणाचे नाव आहे. तो काँग्रेस पक्षाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( Bharati university Police station ) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

खुनाचे घटनास्थळ
खुनाचे घटनास्थळ

हेही वाचा-Aurangabad Crime - प्रेमविवाह केल्याने भावाने केली बहिणीची हत्या

दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चौकात आला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी समीरवर सहा गोळ्या झाडल्या. यामध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात ( firing in Punes Chandrabhaga Chowk ) गोळीबाराचा थरार घडला आहे. दरम्यान शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याचा संशय

हेही वाचा-Thane Crime : जुगारी बापाने घेतला आपल्याच मुलीचा जीव

एक संशयित ताब्यात -

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर ( Senior PI Jagnnath Kalaskar ) यांनी सांगितले.

आर्थिक देवाण-घेवाणीवरून हत्या-

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर यांच्या माहितीनुसार मृत समीर हा बांधकाम व्यावसायिक होता. आर्थिक देवाणघेवाणीतून जुन्या सहकाऱ्याने बांधकाम व्यावसायिकाचा खून केला आहे. मारेकरी आणि बांधकाम व्यावसायिक हे जनता वसाहतीमधील रहिवाशी आहेत. आर्थिक देवाणघेवाणीमधून हा खून झाला आहे. यापूर्वी अटकेतील व खून झालेल्या व्यक्तीवर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही.

हेही वाचा-शौचालयास गेलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या, अमरावती जिल्ह्यातील घटना

ऑक्टोबरमध्ये पुण्यात खुनांचे सत्र-

शहरातील हडपसर परिसरात लहान भावाचा मोठ्या भावाने मानेवर फॅनचे हुक घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर 2021 मध्ये समोर आला आहे. पुणे शहरात सोमवारी रात्री एकाच वेळी दोन ठिकाणी दोन तरुणाच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला होता. हडपसर येथील सोलापूर रोडवरील चौकात एका रिक्षाचालकाच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

Last Updated : Dec 6, 2021, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.