ETV Bharat / city

Kirit Somaiya In Pune : सोमैया यांचा आता भाजपाकडून पायरीवर सत्कार; कार्यक्रम उधळण्याचा काँग्रेसचा इशारा - Congress opposes Kirit Somaiya

आज किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेत भाजपाकडून सत्कार करण्यात येणार आहे. मात्र, काँग्रेसने मात्र या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. (Shivsena Attack Kirit Somaiya) त्या कार्यक्रमाला महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.

मोहन जोशी, माजी आमदार, काँग्रेस
मोहन जोशी, माजी आमदार, काँग्रेस
author img

By

Published : Feb 11, 2022, 11:16 AM IST

Updated : Feb 11, 2022, 11:45 AM IST

मुंबई - भाजप नेते किरीट सोमै्या हे मागील आठवड्यात पुणे महापालिकेत आले असता शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती. ज्यामध्ये ते जखमी झाले होते. एवढेच नाही तर भाजप नेते किरीट सोमय्या हे या धककबुक्कीत महापालिकेच्या पायऱ्यांवरती पडले देखील होते. (Kirit Somaiya In Pune) दरम्यान, आज किरीट सोमय्या पुन्हा पुणे महापालिकेत येणार आहेत (Congress opposes Kirit Somaiya) आणि या साऱ्या घटनेमुळे महापालिकेत भाजपच्या वतीने सोमय्या यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवले होते त्या ठिकाणी हा सत्कार केला जाणार आहे.

किरीट सोमय्या यांचा भाजपतर्फे सत्कार

किरीट सोमय्या यांच्या आजच्या पुणे दौऱ्या दरम्यान ते ४ वाजता पुणे महापालिकेत येणार आहेत.पुणे महापालिकेतील पायऱ्यांवर भाजपतर्फे त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे. (Attack on Kirit Somaiya) मात्र काँग्रेसने याला विरोध केला आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. त्या कार्यक्रमाला महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.

आंदोलन करण्यात येईल असा इशारा

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार शहराच्या परंपरेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. (Kirit Somaiya on Pune Visit) जर पालिका प्रशासनाने किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील काँग्रेसने दिला आहे.

हेही वाचा - Saamana Editorial On Modi : मोदींनी ज्या संसदेच्या पायरीवर डोके ठेवले ती संसद अश्रू ढाळत असेल!

Last Updated : Feb 11, 2022, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.