पुणे - 'गो बॅक मोदी ' म्हणत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे येथील दौऱ्याला विरोध केला आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. (Congress agitation against PM Modi ) आता पुण्यात महापालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर ही नौटंकी आहे, असा आरोपही येथील कार्यकर्त्यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाची जोरदार निदर्शने
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस पक्षाने आंदोलन करत जोरदार विरोध केला आहे. (Congress agitation against PM) जर मोदी पुण्याला येत असतील तर काँग्रेस जोरदार निदर्शने करत त्यांचा विरोध करेल, असा इशारा या आधीच काँग्रेसने दिला होता.
महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी
काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात पोहोचतील. त्यापूर्वीच पुण्यातील अलका टॉकीज चौक येथे काँग्रेसने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. अर्ध्या मेट्रोचे उद्घाटन करत मोदींनी हा फक्त पब्लिसिटी स्टंट केला आहे. असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर मोदी हे फक्त भाजपच्या प्रचारासाठी पुण्यात येत आहेत. त्यांनी लोकसभेत केलेल्या विधानाबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील काँग्रेस आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
हेही वाचा - PM In Pune Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आज पुणे दौऱ्यावर! 'ईटीव्ही भारत'कडून आढावा