पुणे- पुण्यासह संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांत हवामानात मोठ्या प्रमाणात गारठा ( Cold atmosphere in Pune ) जाणवत आहे. पुण्यातदेखील मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. राज्यातील थंडी वाढण्याचे नेमकी कारणे ( cold wave in Maharashtra ) काय आहेत, हे हवामान तज्ज्ञांनी सांगितले ( Meteorologist on cold in Pune ) आहे.
पुण्याच्या हवामानाचा विचार करता हवेतील गुणवत्तादेखील ढासळत चालली आहे. त्यातच आता ही थंडी आणखीन २ ते ३ दिवस अशीच राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा-Kangana Ranaut VS Javed Akhtar Case : अभिनेत्री कंगना रनौतची मुंबई सत्र न्यायालयात धाव
पुण्यातील गारवा आणखीन काही दिवस असाच राहील, असे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. त्याचबरोबर मागील 24 तासांत पुण्यासह राज्याच्या इतर काही ठिकाणी ओलसर वातावरण जाणवत आहे. पण या हवामान बदलाचे नेमक कारण काय आहे? तर मागील दोन दिवसात पुण्याच्या कमाल तापमानात मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातील हवेची गुणवत्तादेखील ढासळलेली दिसत आहे. या साऱ्यामुळेच शहरात थंडी आणखीन वाढण्याचेदेखील संकेत आहेत.
हेही वाचा-SRPF jawan suicide : मंत्रालयाच्या मुख्य गेटवरील एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
सोमवारी झालेल्या हवामानाची नोंद
हवामान खात्याने मंगळवारी तापमानाची आकडेवारी दिली आहे. तीदेखील लक्ष देण्यासारखी आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार सोमवारी पुण्यात किमान सरासरी तापमान १०.४ सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणीदेखील किमान तापमान ६.५ सेल्सियस इतके नोंदविण्यात आले होते.
महाबळेश्वर येथे पुढील 5 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सियसने हळूहळू तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर 25 व 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे. गारवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजेच सात ते आठ फेब्रुवारीपर्यंत असाच कायम राहील. या वातावरणात थोडा बदल होईल. मात्र, गारठा असाच राहिल, असे मत हवामान तज्ज्ञ मकरंद कुलकर्णी ( Meteorologist Makarand Kulkarni on cold wave ) यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा-Corona Update : भारतात गेल्या 24 तासात कोरोना रुग्ण संख्येत घट