पुणे - कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा रविवारी केली. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे सागत घरुन काम करा असे आवाहन ही केले. मात्र, पुण्यात आज सकाळपासूनच लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून रस्त्यांवर काही ठिकाणी वाहनांसह गर्दी करत आहे. पोलीस प्रशासनाकडून वारंवार चौका चौकात नारिकांना तसेच रिक्षा चालकांना सूचना कराव्या लागत आहे.
कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाहीत. परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. परस्थितीला लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. पोलीस प्रशासनाकडून वारंवार सूचना करूनही लोक ऐकत नाहीत. शहरातील रस्त्यांवर नागरिक, रिक्षा चालक फिरतानाचे चित्र दिसत आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. या दोन शहरांमध्ये सर्वात जास्त चिंतेचे वातावरण आहे. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. असे असतानाही लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.