ETV Bharat / city

Pune Crime : येरवडा परिसरात सराईत गुन्हेगारासह नागरिकांचा पोलिसांवर हल्ला - Citizens attack police in Yerawada area

येरवडा येथे एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Citizens Attack Police In Yerawada Area) दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान राखून आपल्या बचावासाठी हवेत गोळीबार केल्यामुळे जमाव पांगला. ही घटना (दि.30 डिसेंबर)गुरुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

येरवडा पोलिसांच्या पथकावर जमावाचा हल्ला
येरवडा पोलिसांच्या पथकावर जमावाचा हल्ला
author img

By

Published : Dec 31, 2021, 9:42 AM IST

Updated : Dec 31, 2021, 1:13 PM IST

पुणे - येरवडा येथे एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान राखून आपल्या बचावासाठी हवेत गोळीबार केल्यामुळे जमाव पांगला. (Citizens Attack Police) ही घटना (दि.30 डिसेंबर)गुरुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

व्हिडिओ
एका पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी जखमी

येरवडा येथील कोतेवस्तीमध्ये धर्मसमभाव नावाची म्हाडा वसाहत आहे. स्थानिक रहिवाशांना तेथील शक्‍ती सिंह नावाचा सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदार त्रास देत होते. याप्रकरणी नागरिकांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, येरवडा पोलिसांचे एक पथक गुरुवारी रात्री शक्‍ती सिंह यास पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी सिंह याने समाजातील नागरिकांना पोलिसांविरुद्ध भडकावले. सिंह याचे ऐकून समाजातील नागरिकांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला. त्यानंतर शक्‍ती सिंह याला ताब्यात घेतले.

Last Updated : Dec 31, 2021, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.