पुणे - बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन गुरुवारी (ता. ११) साजरा होणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. रक्षाबंधनही निर्बंधात साजरे करावी लागली. पण यंदा निर्बंध मुक्त झाले असल्याने आणि रक्षाबंधन ( Rakshabandhan festival ) अकरा दिवसांवर येऊन ठेपलेल असल्याने पुण्यातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. बाजारात विविध प्रकारच्या राख्या जरी दाखल झाल्या असल्या तरी सध्या पुणे शहरात चॉकलेट राखीचा क्रेझ ( Chocolate Rakhi Craze ) असून पुण्यातील मुर्तिज बेकरीमध्ये ( Murtijs Bakery Pune ) आकर्षक अश्या चॉकलेटच्या राख्या विक्री साठी उपलब्ध झाल्या आहे.
अशी झाली सुरूवात - मुर्तिज बेकरीमध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून या चॉकलेट राख्या तयार होत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधल्यानंतर काहीतरी गोड खायला द्यायची परंपरा आहे. आणि हीच परंपरा लक्षात घेता मुर्तिज बेकरीचे मालक विक्रम मूर्ती यांनी चॉकलेट राख्या बनवायला सुरवात केली. सुरवातीला फक्त एक दोन प्रकारच्याच चॉकलेट राख्या तयार केले जात होत्या, मात्र हळूहळू नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने चॉकलेट राखी आता दहा ते बारा प्रकारांमध्ये उपलब्ध होत आहे.
देशभरातून ग्राहक येऊन खरेदी करतात चॉकलेट राख्या - रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधल्यानंतर त्यावर विविध चॉकलेट फ्लेवरने बनविलेले चॉकलेट हे खाता ही येऊ शकणार आहे. मुर्तिज बेकरीमध्ये गुलाब, बाहुली, तसेच नावाची राखी, तसेच विविध प्रकारचे चॉकलेट राख्या तयार होत आहे. फक्त पुणे शहरातूनच नव्हे तर देशभरातील विविध ठिकाणाहून ग्राहक या चॉकलेट राख्या खरेदी करण्यासाठी येत असतात. यंदाही नागरिकांमध्ये चॉकलेट राख्यांचा मोठा क्रेझ ( Chocolate Rakhi Craze Starts In Pune ) असून, नागरिक मोठ्या प्रमाणात चॉकलेट राख्या खरेदी करत आहे. तसेच बहीण आपल्या भावाच्या नावाची राखी देखील याच ठिकाणाहून बनवून घेत आहे.
विविध सणांमध्ये देखील बनविले जातात चॉकलेट पासून पदार्थ - मुर्तिज बेकरीमध्ये विविध सणांच्या निमित्ताने चॉकलेटचे पदार्थ हे बनविले जातात. रक्षाबंधन मध्ये चॉकलेट राख्या, तर गणेशोत्सवात चॉकलेट पासून मोदक, आणि दिवाळीत चॉकलेटचे फटाके अश्या प्रकारे या बेकरी मध्ये विविध पदार्थ हे बनविले जातात. विशेष म्हणजे या चॉकलेट राख्या हे अत्यंत अल्प दरात आहे. तर या चॉकलेट राख्या ह्या सीमेवरील जवानांना देखील पाठवले जातात.
हेही वाचा : Rakhi Festival : पुणे शहरात आकर्षक राख्या विक्रीस दाखल; यंदा राख्यांच्या किंमतीत 20 टक्के वाढ