ETV Bharat / city

'या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका'; चित्रा वाघ यांचे शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप

भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेचे नेते रघुनात कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुचिक यांनी एका तरुणीवर बलात्कार (Pune Rape Case) करुन तिला गर्भपात करायला लावला. त्यानंतरही कुचिक यांना जामीन देण्यात आला असून ते या तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

chitra wagh
चित्रा वाघ
author img

By

Published : Mar 14, 2022, 3:19 PM IST

Updated : Mar 14, 2022, 7:08 PM IST

पुणे - पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape Case) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी ती मुलगी कालपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी या पीडितेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुणे पोलिसांच्या (Pune Police) प्रसंगावधानाने त्या मुलीला वाचवण्यात यश आले. पण आता मात्र ती मुलगी कुठेच सापडत नाही. याप्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रघुनाथ कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांना विनंती -

दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ या प्रकरणी अधिकच आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. शनिवारी त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ टाकत शिवसेनेचा पुण्याचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक असे म्हणत अत्याचारीत मुलीने FB वर पोस्ट करत कुठूनही न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करते असं लिहीले आहे. पुणे पोलीस आयुक्त, सहआयुक्त, गृहमंत्री सगळ्यांना कळवले आहे की तिच्या जिवाचे बरेवाईट झाले तर सर्वस्वी जबाबदार सरकार व पोलीस असतील, असा इशारा देत त्या मुलीला वाचवण्याची विनंती केली होती.

कुचिक यांचा मुख्यमंत्र्यांसोबतच फोटो ट्विट -

  • 1️⃣ हाचं तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक….

    ज्याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात ही करवला

    न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये..ती गायब आहे @AjitPawarSpeaks pic.twitter.com/WOD7BQ6QaJ

    — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आता ती पीडित मुलगी गायब झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांचा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा एक फोटो ट्विट करत हाच तो बलात्कारी पुण्याचा शिवसेना नेता रघुनाथ कुचिक असा घणाघात केला आहे.

कुचिक याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपातही केला. तिने न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तिने काल FB पोस्ट केली, अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाही. ती गायब आहे. कुठे गेलीये ती मुलगी की यानेच तिला गायब केली अशी टीका करत याचाही तपास करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चित्रा वाघ यांनी केली आहे.

तसेच या पीडीतेची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय, आत्महत्येला प्रवृत्त करणाऱया कुचिकवर तत्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा, अशी विनंती देखील चित्रा वाघ यांनी मुख्मंत्र्यांकडे केली आहे.

काय आहे प्रकरण

काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी एका २४ वर्षाच्या तरुणीसोबत तिला लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातच ही तरुणी प्रेग्नेंट झाली आणि त्यानंतर आरोपीने बळजबरीने तरुणीचा गर्भपात केला. तसेच या साऱ्या प्रकाराबद्दल जर कोणाला काही सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी देखील दिली आहे, अशी तक्रार या तरुणीने केली होती. त्यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात कलम ३७६, ३१३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Last Updated : Mar 14, 2022, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.