पुणे : काहीना वाटले आम्ही राजकिय आत्महत्या केली, पण आम्ही रिस्क घेतली, यात आमचा कार्यक्रम झाला असता, परंतु हे सरकार तुमचं जनतेचे सरकार आहे. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेचे सासवड येथील जाहीर सभेत समर्थन केल आहे. मुख्यमत्री शिंदे ( CM Eknath Shinde ) मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांचा मंगळवारी सासवड येथे जाहीर शेतकरी मेळावा पार पडला. तर माजी मंत्री विजय शिवतारे ( Former minister Vijay Sivatare ) यांनी हा मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मी तरी निवडून येऊ शकलो असतो मला कुठल्याही चिन्हाची गरज नाही, परंतु माझ्यासोबत चाळीस लोक आहेत. त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
संजय राऊत आणि शिवसेनेवरही निशाणा साधला - प्रस्तावित विमानतळावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जमिनी घेतल्या जाणार नाही जे काही विमानतळ होईल ते सर्वांच्या सहमतीने होईल ज्या गावांचा विरोध आहे त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारे त्यांना बळजबरी केली जाणार नाही हे विमानतळ नेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु आता आपण आलोय त्यामुळे जाणार नाही असं म्हणत त्याने अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अप्रत्यक्षरीत्या संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे आम्ही सासवडच्या पाण्याची पट्टी जी आहे ती एक रुपयाने कमी केलेली आहे आणि पूर्वीचे सरकार होते ते डबल करत होते आणि डबल झालेले पैसे हे दुसरीकडे जात होते. ते सरकारकडे येत नव्हते आता हे कमी केलेले एक रुपया पण सरकारकडे येईल आणि ते जनतेच्या कामासाठी पैसे वापरता येईल असे म्हणत त्याने संजय राऊत आणि शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.
शिंदे गटातले कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थितीत - यावेळी विविध विकास कामाच्या निधी देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे गुंजवणी पाईपलाईन साठी 50 कोटी रुपये फुरसुंगीच्या पाणी प्रश्नावर पंचवीस कोटी रुपये आमच्या सरकार देईल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जाहीर सभेला आमदार शहाजी बापू पाटील, आमदार भरत गोगावले, माजी मंत्री उदय सामंत, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय बापू शिवतारे, यास शिवसेनेचे शिंदे गटातले सर्व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सभेला उपस्थित होते. हे सरकार हे जनतेचे सरकार आहे येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये हे सरकार शिवसेनिकांचे काम करेल गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं तडीपार झाले शिवसैनिक शिवसेनेला निधी मिळाला नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आम्ही आणलं अटल बिहारी वाजपेयी यांचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भावनिक साद लोकांना घातलेली आहे. सरकार तुमचं आहे. हा एकनाथ शिंदे तुमच्या कुटुंबातलाच एक माणूस आहे. त्यामुळे कधीही मंत्रालयात तुमच्या कामाला अडचणी येणार नाही. तुमचा आम्हाला पाठिंबा आहे का? असेही जाहीर सभेतून मुख्यमंत्र्यांनी जनतेला विचारले, त्यामुळे हे सरकार जनतेच्या हिताचे असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.