पुणे - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेला एम्पिरिकल डेटा (OBC Empirical Data)देत नाही. आम्ही डेटा गोळा करायला तयार आहोत मात्र जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, ही आमची भूमिका आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे लोक एकीकडे जनजागृती करण्याचे नाटक करत रस्त्यावर उतरत आहेत. तर दुसरीकडे आम्ही काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतात. हा दुटप्पीपणा चालणार नाही. आज देशात गाई-म्हशींची जनगणना केली जाते मग ओबीसींची (OBC Census) का नाही, असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आयोजित 131 वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिन साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
संविधान आणि संविधानिक संस्था धोक्यात -
महात्मा फुले यांनी ज्या वर्गाला ओळख देण्याचा प्रयत्न केला त्याच वर्गाला सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजी यांनी केला आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना संविधानिक अधिकार देऊन समृद्धीचा मार्ग दाखवला. आता मात्र संविधान आणि संविधानिक संस्था धोक्यात आहेत. संविधान संपलं तर आपलं अस्तित्व देखील संपून जाईल त्यामुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत यावेळी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले यांनी खर्या अर्थाने सत्यशोधक समाज घडविले -
जिथे महात्मा फुले यांचा जन्म झाला अशा पुण्य भूमिला मी नमन करतो. महात्मा फुले येथे राहायचे. अनेक पुस्तकांची निर्मिती येथे झाली. तसेच समाज सुधारक कामालाही याच वास्तूत सुरुवात झाली. ही वास्तू त्यांच्या प्रत्येक कार्याची साक्षीदार आहे. त्या काळात त्यांनी आपल्या विहिरीचे पाणी सर्वांसाठी खुले केले आणि त्याच पाण्याने ते सर्व समाजाशी जोडले गेले. त्यांनी खर्या अर्थाने सत्यशोधक समाज घडविले. आपल्याला बरोबरीचे अधिकार संविधानाने दिला पण आज तेच संविधान धोक्यात आहे. संविधान संपलं तर आपलं अस्तित्व देखील संपून जाईल त्यामुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे. असे देखील यावेळी बघेल यांनी सांगितले.
Bhujbal On OBC Census : गाय म्हशींची जनगणना करता, मग ओबीसींची का नाही.. भुजबळांचा केंद्राला सवाल - ओबीसी जनगणना
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेला एम्पिरिकल डेटा (OBC Empirical Data) देत नाही. आम्ही डेटा गोळा करायला तयार आहोत मात्र जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, ही आमची भूमिका आहे. आज देशात गाई-म्हशींची जनगणना केली जाते मग ओबीसींची (OBC Census) का नाही, असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला आहे.