ETV Bharat / city

वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करा; खासदार सुळेंची ट्विटद्वारे मागणी

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे वेल्हा तालुक्याचे नामकरण करुन राजगड हे नाव देण्याची केली आहे. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड किल्लाची ओळख आहे. राजगड किल्ला हा वेल्हा तालुक्यात आहे.

author img

By

Published : Jul 31, 2019, 12:06 PM IST

खासदार सुप्रिया सुळे

पुणे - मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड किल्ल्याची ओळख आहे. राजगड किल्ला हा वेल्हा तालुक्यात आहे. त्यामुळे त्या किल्ल्याचे नाव वेल्हा तालुक्याला देण्यात यावे, अशी मागणी बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, छत्रपती शिवरायांनी उभारलेली स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड हा वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले, जपले आणि ते प्रत्यक्षातही आणले. विशेष म्हणजे जुन्या दस्ताऐवजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत 'राजगड तालुका' असाच उल्लेख आढळतो.

शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती, असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

Intro:मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड किल्ला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी मागणी बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली. Body:आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे.येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला.स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. विशेष म्हणजे जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत 'राजगड तालुका' असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती.
Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.