पुणे - कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीत जम्बो रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू केले जावे, अशी अपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र आमदार पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार लिहिले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जम्बो रुग्णालयात व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विविध तक्रारींसह मागण्यांचा पाढाच वाचला आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. पुण्यात रोज नवीन साडेचार हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे असलेली रुग्ण आहेत.
हेही वाचा-सचिन तेंडुलकर कोरोनाग्रस्त, कुटुंबियांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
- मनपाच्या हेल्पलाईन सेवेबाबत ही तक्रारी वाढल्या आहेत. ऑपरेटर फोन उचलत नाहीत.
- ऑपरेटरकडे माहिती उपलब्ध नाही, अशा तक्रारींचा ओघ वाढत आहे.
- या सेवेचा नागरिकांना लाभ व्हावा या दृष्टीने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
- पुण्यात खासगी रुग्णालयातील किमान 80 टक्के खाटा या कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवाव्यात.
- त्या राखीव खाटा ताब्यात घेण्याची कार्यवाही त्वरित सुरू करावी अशी पाटील यांनी मागणी केली आहे.
- व्यक्तीगत कारणाने किंवा जागे अभावी अनेक रुग्णांना घरी विलगीकरणात रहाणे शक्य होत नाही. अशा रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र सुरू करावेत.
- जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहू शकतात. अशा रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करून त्यांना रुग्णालयात भरती होण्यापासुन परावृत्त करावे.
- अत्यवस्थ व इतर आजार असलेल्या कोरोना रुग्णांसाठी अधिक खाटा उपलब्ध लागणार आहेत. तरी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा-दीपाली चव्हाण प्रकरण: शिवकुमार आणि चव्हाण फोनवर कसे बोलायचे ते ऐका...
होळी आणि रंगपंचमीवर निर्बंध..
दरम्यान, पुणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात होळी आणि धुलीवंदन, रंगपंचमी हे सण खासगी तसेच सार्वजनिकरित्या साजरे करण्यास मनाई करण्यात आली असून या संदर्भात महापालिका आयुक्तांनी आदेश काढले आहेत. शहरातील विविध कार्यक्रम, सणांवर बंधने असताना पुणे शहरात वाढणाऱ्या नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. बुधवारी २४ मार्चला दिवसभरात शहरात ३५०९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.