ETV Bharat / city

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य: म्हणाले...

अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीतून जे बाहेर पडेल त्याने सर्वसामान्य माणसांचा राजकारणावरील विश्वास उडेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर समाधान व्यक्त केले.

Chandrakant Patil criticized the resignation of the Home Minister
अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीतून जे बाहेर पडेल त्याने सर्वसामान्य माणसांचा राजकारणावरील विश्वास उडेल - चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Apr 5, 2021, 5:42 PM IST

Updated : Apr 5, 2021, 5:49 PM IST

पुणे - सीबीआयचे अधिकारी जेव्हा अनिल देशमुख यांची चौकशी करतील तेव्हा त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर पडतील. तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य माणसांचा राजकारणावरील विश्वास उडेल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. शिवाय अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीतून जे बाहेर पडेल त्याने सर्वसामान्य माणसांचा राजकारणावरील विश्वास उडेल - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, सीबीआयच्या 15 दिवसांच्या प्राथमिक चौकशीतून अनिल देशमुखांनी सचिन वाझेना खरेच 100 कोटी गोळा करून देण्यास सांगितले होते का? हे पैसे कसे गोळा करायचे याचा हिशोब सांगितला होता की नाही? हे सगळे चौकशीतून बाहेर पडेल. सीबीआय त्यांच्या स्टाईलने हे सगळे बाहेर काढेल. ते जेव्हा महाराष्ट्राच्या जनते समोर जाईल तेव्हा त्यांचा राजकारणावरील विश्वास उडेल.

पाटील म्हणाले, चुकीच्या व्यक्तीला शासन अशी परंपरा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनात एक प्रकारची शंका होती. शरद पवारांच्या निवासस्थानी याआधीही बैठका झाल्या होत्या. धनंजय मुंडेंवर आरोप झाले तेव्हाही शरद पवारांच्या घरी सहा तास बैठक झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला नाही. अनिल देशमुख यांच्या बाबतीतही तेच झाले. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत असा निर्णय झाला. शरद पवारांनी देखील अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह होते, क्वारंटाईन होते असे सांगितले. मात्र, या सर्व बाबतीत ते जेव्हा खोटे पडले तेव्हा त्यांनी याविषयी बोलणेच बंद केले.

शरद पवार जोपर्यंत निर्णय करत नाहीत तोपर्यंत अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला नसता. अखेर शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयची चौकशी लागल्यानंतर मंत्रीपदावर राहता येत नाही, याची जाणीव ठेवून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला याबद्दल मी समाधान व्यक्त करतो असे पाटील म्हणाले.

Last Updated : Apr 5, 2021, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.