ETV Bharat / city

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह कुटुंबावर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दीराने लैंगिक अत्याचार केल्यानंतर शरीर संबंधाबाबत कोणाला काही सांगितल्यास कुठे गायब करेल कळणार नाही, अशी धमकी दिली होती.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 10, 2019, 9:13 AM IST

Updated : Apr 10, 2019, 12:31 PM IST

पुणे - वडगावशेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कुटुंबावर सुनेचा मानसिक छळ, पतीने अनैसर्गिक अत्याचार आणि दीराने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगावशेरी येथील माजी आमदार, पीडित महिलेचा पती, सासू, दीर, नंनद आणि आणखी २ व्यक्तींनी २००८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वरील सर्वांनी सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर, दीराने लैंगिक अत्याचार केल्यानंतर शरीर संबंधाबाबत कोणाला काही सांगितल्यास कुठे गायब करेल कळणार नाही, अशी धमकी दिली होती. तर पतीनेदेखील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला, असे पीडित महिलेने सांगितले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Intro:पुण्यातील वडगावशेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह कुटुंबावर सुनेचा मानसिक छळ, पतीने अनैसर्गिक आणि दिराने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरी येथील माजी आमदार बापूसाहेब पठारे, पीडित महिलेचा पती रवींद्र, सासू संजिला, दीर सुरेंद्र, नंनद दिपाली गव्हाणे आणि आणखी दोन व्यक्तीनी 2008 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत वरील सर्वानी त्यांच्या सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची घटना घडली आहे. तर त्याच दरम्यान दीर सुरेंद्र पठारे याने लैंगिक अत्याचार केल्यानंतर शरीर संबधाबाबत कोणाला काही सांगितल्यास कुठे गायब करेल कळणार पण नाही. अशी धमकी दिली. तर या सर्व घटना दरम्यान पतीने माझ्याशी अनैसर्गिक संभोग देखील केला आहे. अशी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.Conclusion:Ok
Last Updated : Apr 10, 2019, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.