ETV Bharat / city

मराठा आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी माजी आमदार दिलीप मोहितेंविरोधात होणार पोलिसांची कारवाई ?

गेल्या वर्षी चाकण येथे मराठा आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. याप्रकरणी चाकण पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याविरोधात कारवाईची शक्यता आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांकडून कारवाईची शक्यता असल्याने दिलीप मोहिते यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

author img

By

Published : Jul 15, 2019, 6:33 PM IST

Updated : Jul 15, 2019, 7:28 PM IST

मराठा समाजामार्फत कारवाई प्रकरणी निषेध सभा

पुणे - चाकण औद्योगिक नगरीत गेल्या वर्षी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी मोर्चा काढला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याने मोहिते यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दिलीप मोहितेंवरील कारवाई : मराठा समाजामार्फत निषेध सभा

पाटील यांनी आंदोलकांना भडकावणारे भाषण केले ?

दिलीप मोहिते पाटील यांनी आंदोलकांना भडकावणारे भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यांच्या भाषणानंतरच या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचा ठपकाही त्यांच्यावर पोलिसांच्या वतीने ठेवण्यात आला. आंदोलकांनी थेट पोलिसांवर हल्ला केल्याचाही आरोप करण्यात आल्याने माजी आमदार पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

पाटील यांच्यावरील कारवाई राजकीय सुडातूनच

दिलीप मोहितेंवर केलेली कारवाई ही राजकीय सुडापोटी असल्याची नागरिकांची भावना आहे. दरम्यान या घटनेनंतर खेड तालुक्यातील गावागावात मराठा समाजाकडून या प्रकरणी निषेध सभा घेतल्या जात आहेत.

शिरुर लोकसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणातून शिवसेनेचा दारुण पराभव झाला. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचाराचा ठपका ठेवत दिलीप मोहितेंवर कारवाई करण्यात येत असल्याने, राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. दरम्यान व्हिडिओ चित्रिकरणाच्या माध्यमातून पडताळणी करत पोलीस अनेक साक्षी पुराव्यांचा आधार घेत आहेत. पोलिसांकडून यापुर्वीच काही आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून काहींना अटक करण्यात आली आहे.

Intro:Anc__चाकण औद्योगिक नगरीतील एक मराठा लाख मराठाचा ऐलार करत मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते त्यानंतर अनेक आंदोलकांचे अटक सत्र सुरु करण्यात आहे मात्र आता या हिंसक आंदोलनाचा ठपका ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या ठेवण्यात आला असुन त्यांच्या नुसार चाकण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आहे

शिरुर लोकसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणावरुन राजकारण रणधुमाळी तापली होती त्यामध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकण हिंसक आंदोलनाचा टपका ठेवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेंवर कारवाईच्या घडामोंडींना वेग आला असुन हि कारवाई राजकिय सुडातुनच केली जात असल्याने खेड तालुक्यातील गावागावांत मराठा समाज निषेध सभा घेत आहे

आमच्या हक्काचे मराठा आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे यासाठी पुणे नाशिक महामार्गावर चाकण औद्योगिक नगरी व राजगुरुनगर येथे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आंदोलकांना भडकाव करणारे भाषण केल्याचे बोलले जात आहे त्यानंतर दुपारच्या सुमारास या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडुन थेट बंदोबस्तात असणा-या पोलीसांवर हल्ला करण्यात आला होता त्यामध्ये पोलीसही जखमी झाले होते या सर्व घटनेची पोलीसांनी तातडीची दखल घेऊन व्हिडिओ चित्रिकरणाच्या माध्यमातून पडताळणी केली व अनेकांच्या साक्ष नोंदवण्यात आली त्यानुसार आंदोलकांवर यापुर्वीच गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली होती

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मराठा आरक्षणाच्या चाकण हिंसक आंदोलनात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अद्याप अटक करण्यात नाहीBody:...Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.